राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 परीक्षेसाठी प्रवेश प्रमाणपत्रे जारी, MPSC आयोगाने दिल्या महत्वाच्या सूचना

| Updated on: Nov 26, 2021 | 9:41 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएसी आयोगामार्फत दिनांक 4, 5 व 6 डिसेंबर 2021 रोजी नियोजित राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाने जारी केले आहेत.

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 परीक्षेसाठी प्रवेश प्रमाणपत्रे जारी, MPSC आयोगाने दिल्या महत्वाच्या सूचना
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएसी आयोगामार्फत दिनांक 4, 5 व 6 डिसेंबर 2021 रोजी नियोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाने जारी केले आहेत. आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील उमेदवारांच्या खात्यामध्ये ही प्रवेश प्रमाणपत्रे पाहता तसेच मिळवता येतील.

ही प्रमाणपत्रे जारी केल्यानंतर एमपीएससीने उमेदवारांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये उमेदवाराने परीक्षेच्या ठिकाणी कधी हजर रहावे त्यासाठी काय नियम आहेत. तसेच कोरोना नियम कोणते आहेत, याबाबत आयोगाने संकेतस्थळावर सविस्तर माहिती दिली आहे.

 दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक

परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य

परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. कोव्हिड 19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.

योगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल

आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजनासंदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.

लोकल प्रवासास अनुमती देण्यात आली

मुंबई महानगर क्षेत्रातील उमेदवारांना परीक्षेच्या दिवशी उपकेंद्रावर पोहोचण्यासाठी लोकल प्रवासास अनुमती देण्यात आली आहे. प्रस्तुत परीक्षेच्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारांना परीक्षेच्या ठिकाणच्या नजीकच्या रेल्वे स्थानकापर्यंतचे तिकिट प्राप्त करून घेता येईल. प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल व/अथवा 1800-1243-275 किंवा 7303821822 या दूरध्वनी क्रमांकावरुन
विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

इतर बातम्या :

मोठी बातमी ! फ्रान्स, जर्मनी, इंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट धडकली, पोर्तुगाल, झेक रिपब्लिकमध्ये आणीबाणीची घोषणा

Covid Updates: यूरोपमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं, तिसऱ्या लाटेनं मृत्यूचं तांडव, भारतासाठीही धोक्याची घंटा?

Afghan Girl: हिरव्या डोळ्याच्या ‘त्या’ अफगाण मुलीची तालिबानपासून सुटका, मिळाला या देशात आश्रय