AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET 2021 Exam Date : नीटची परीक्षा 5 सप्टेंबरला होणार नाही, व्हायरल नोटीस खोटी, लवकरच येईल परीक्षेच्या तारखेचा निर्णय

यावर्षी नीटने जेईई मेन 2021 च्या प्रलंबित सत्रांसाठी परीक्षा केंद्रांची संख्या 660 वरून 828 लाख केली आहे, जी क्रमशः 6.80 लाख आणि 6.09 लाख उमेदवारांसाठी आहे, ज्यांनी एप्रिल आणि मे सत्रासाठी रजिस्ट्रेशन केले होते. (NEET exam will not be held on September 5, viral notice is false, decision on exam date will come soon)

NEET 2021 Exam Date : नीटची परीक्षा 5 सप्टेंबरला होणार नाही, व्हायरल नोटीस खोटी, लवकरच येईल परीक्षेच्या तारखेचा निर्णय
नीट परीक्षेसाठी दोन टप्प्यांत करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या नवे बदल
| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 8:46 PM
Share

नवी दिल्ली : नीट परीक्षेच्या तारखेसंदर्भात एक नोटीस व्हायरल होत असून यात 5 सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही नोटीस खोटी आहे. अधिकृत नोटिसमध्ये नीटने म्हटले आहे की परीक्षेच्या तारखेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि व्हायरल नोटीस खोटी आहे. नीटने सांगितले की, लवकरच भागधारकांशी सल्लामसलत करून नीट परीक्षेची तारीख निश्चित केली जाईल. वृत्तानुसार, आता नीट परीक्षेच्या तारखेसंदर्भातील विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपेल. नीट परीक्षेची तारीख लवकरच प्रसिद्ध केली जाईल. (NEET exam will not be held on September 5, viral notice is false, decision on exam date will come soon)

यावर्षी नीटने जेईई मेन 2021 च्या प्रलंबित सत्रांसाठी परीक्षा केंद्रांची संख्या 660 वरून 828 लाख केली आहे, जी क्रमशः 6.80 लाख आणि 6.09 लाख उमेदवारांसाठी आहे, ज्यांनी एप्रिल आणि मे सत्रासाठी रजिस्ट्रेशन केले होते. ज्या शहरांमध्ये परीक्षा घेतली जाईल, त्या शहरांची संख्याही 232 वरून 334 झाली आहे. नीटमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास दुप्पट आहे (दरवर्षी किमान 14 लाख) म्हणून एनटीएला परीक्षा केंद्र, शहरे इत्यादींची विशेष काळजी घ्यावी लागेल.

ही कागदपत्रे आवश्यक

जे विद्यार्थी यावर्षी बारावीच्या बोर्ड परीक्षेस बसतील तेदेखील या प्रवेश परीक्षेस पात्र असतील. उमेदवारांना अर्जात नमूद केलेल्या दहावी आणि बारावी प्रमाणपत्रे आणि गुणपत्रक, आधार कार्डची छायाप्रत, पासपोर्ट क्रमांक, रेशनकार्ड क्रमांक, बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईजचा स्कॅन केलेला फोटो, अर्जाचा नमुना, सही व डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा ही कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. नीट परीक्षेची तारीख आल्यानंतर त्यासाठी नोंदणी सुरू होईल. इच्छुक विद्यार्थी ntaneet.nic.in या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज करू शकतील.

जेईई परीक्षेच्या तारखा जाहीर

अलीकडेच केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या. तिसर्‍या टप्प्यातील परीक्षा जुलै महिन्यात 20 ते 25 या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर, चौथ्या टप्प्यातील परीक्षा 27 जुलै 2021 ते 2 ऑगस्ट 2021 दरम्यान घेण्यात येतील. (NEET exam will not be held on September 5, viral notice is false, decision on exam date will come soon)

इतर बातम्या

नोटाबंदीचा गेम: 25 कोटींच्या नोटांच्या बदल्यात द्यावा लागला 42 कोटींचा टॅक्स, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बाळाचं अपहरण, नंतर हत्या करुन खाडीत पुरलं, पैसे दिले नाही म्हणून तृतीयपंथीचं अमानवीय कृत्य

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.