नॅशनल फर्टिलायजर्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्यास मुदतवाढ, 183 जागांवर भरती

नॅशनल फर्टिलायजर्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करण्यास मुदतवाढ, 183 जागांवर भरती
सैन्य दलांमध्ये 400 पदांची भरती, एनडीए परीक्षेची तारीख जाहीर

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये जाहिरात केलेल्या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार एनएफएलच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतील.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Nov 13, 2021 | 12:17 PM

NFL Recruitment 2021 नवी दिल्ली : नॅशनल फर्टिलायजर्समध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील मिनी-रत्न कंपनी नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) ने विविध युनिट/कार्यालयांमध्ये 183 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. कंपनीने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार (क्रमांक 03/2021) कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक ग्रेड II (उत्पादन, उपकरणे, इलेक्ट्रिकल), लोको अटेंडंट (ग्रेड II आणि ग्रेड-III), परिचर ग्रेड-I (मेकॅनिकल) ऑक्टोबर 2021 फिटर आणि इलेक्ट्रिकल) आणि मार्केटिंग प्रतिनिधी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. आता कंपनीनं 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्यास मुदवाढ दिली आहे.

17 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करा

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 21 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाली आणि उमेदवार आता 17 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एनएफएल भरती 2021 अधिसूचना आणि ऑनलाईन अर्ज पेजवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचण आवश्यक आहे..

असा करा अर्ज?

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडने जारी केलेल्या जाहिरातीनुसार इच्छुक उमेदवार एनएफएलच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतील. nationalfertilizers.com. वेबसाईटला भेट दिल्यानंतर उमेदवारांना करिअर लिंकवर क्लिक करावं लागेल, त्यानंतर एनएफएल विभागात भरती या पर्यायाची निवड करावी . ‘मार्केटिंग, वाहतूक आणि विविध टेक्निकल डिसिप्लिन्स -2020 मध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह (कामगार) भरती’ या लिंकवर क्लिक करावी लागेल.

पोस्टनिहाय रिक्त पदांची संख्या

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक ग्रेड II (उत्पादन) – 87 पदे
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक ग्रेड II (इंस्ट्रुमेंटेशन) – 15 पदे
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक ग्रेड II (इलेक्ट्रिकल) – 7 पदे
लोको अटेंडंट (ग्रेड II) – 4 पदे
लोको अटेंडंट (ग्रेड- III)-19 पदे
परिचर ग्रेड- I (मेकॅनिकल-फिटर)-17 पदे
परिचर ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) – 19 पदे
मार्केटिंग प्रतिनिधी – 15 पदे

वयोमर्यादा

नॅशनल फर्टिलायझरमध्ये अर्ज दाखल करणाऱ्या उमदेवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष असून राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेमध्ये 3 ते 5 वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. तर खुल्या, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी 200 रुपये तर एससी, एसटी आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी फी द्यावी लागणार नाही.

इतर बातम्या:

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अकरावी प्रवेशासाठी विशेष फेरी

आचारसंहितेचे उल्लंघन भोवले; सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

nfl recruitment 2021 applications dates extended for apply online check details here

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें