AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचारसंहितेचे उल्लंघन भोवले; सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, आचारसंहिता देखील लागू झाली आहे . भाजपा नेते किरीट सोमय्या बुलडाणा दौऱ्यावर असताना त्यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन भोवले; सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 11:50 AM
Share

बुलडाणा – विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, आचारसंहिता देखील लागू झाली आहे . भाजपा नेते किरीट सोमय्या बुलडाणा दौऱ्यावर असताना त्यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण देशमुख यांनी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बुलडाणा दौऱ्यावर असताना सोमय्या यांनी शासकीय विश्राम गृहाचा वापर केल्याचा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

चव्हाणांवर मनी लाँड्रिंगचा आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर 53 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. त्या संदर्भातील चौकशीसाठी ते बुलडाण्याला आले होते. मात्र त्यापूर्वी ते आपल्या नियोजित दौऱ्यानुसार सकाळी सहा वाजता रेल्वेने शेगाव रेल्वे स्थानकावर उतरले. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्राम गृह गाठून तीथे दोन तास विश्रांती घेतली. या काळामध्ये सोमय्या यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत माध्यमांशी संवाद देखील साधला.  त्यानंतर त्यांनी गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. शेगावमधील आपले सर्व नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर ते  बुलडाण्याकडे मार्गस्त झाले.

9 नोव्हेंबरपासून आचारसंहितेला सुरुवात 

मात्र राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर 9 नोव्हेंबरपासून आचारसंहितेला सुरुवात झाली आहे. आचारसंहितेमध्ये सोमय्यांनी सरकारी मालमत्तेचा राजकीय कारणासाठी उपयोग केल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण देशमुख यांनी केली आहे. याविरोधात त्यांनी सहाय्यक निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार दाखल केली आहे.

संबंधित बातम्या 

रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

VIDEO: तोंडाला रुमाल, हातात काठ्या, शेकडो तरुण रस्त्यावर; अमरावतीत जमावाकडून प्रचंड दगडफेक

औरंगाबादेत वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेचा मोर्चा; संजय राऊत करणार नेतृत्व

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.