रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

औरंगाबादः त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये त्यांनी टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना हे वक्तव्य केले. देशभरात वाढलेल्या महागाईविरोधात संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त औरंगाबादमध्ये असताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्रिपुरातलं लोण इथे यायचं कारण […]

रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
औरंगाबादमध्ये संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 10:36 AM

औरंगाबादः त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये त्यांनी टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना हे वक्तव्य केले. देशभरात वाढलेल्या महागाईविरोधात संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त औरंगाबादमध्ये असताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.

त्रिपुरातलं लोण इथे यायचं कारण स्पष्ट आहे- राऊत

महाराष्ट्रात पेटलेल्या दंगलींचे कारण काय असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले, ज्या रझा अकादमी संघटनेद्वारे हे लोण पसरवलं जातंय, त्यामागे कोणता पक्ष आहे, हे सर्वश्रुत आहे. अनेक वर्षांपासून या संघटनेला भाजपचेचे खतपाणी आहे. आज महाराष्ट्रात सुरु असलेल्या जाळपोळ आणि दंगलींमागे कोण आहे, हे यावरून स्पष्ट होते. रझा अकादमी हे भाजपचंच पिल्लू आहे. त्यामुळे त्यांच्याच पाठिंब्याने त्रिपुरातलं लोण इथवर पोहोचलं आहे. अन्यथा तिकडे त्रिपुरात घडलेल्या दंगलींचे पडसाद इथे पडण्याचे काय कारण, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये तणाव

त्रिपुरातील हिंसेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमरावती, नांदेड, परभणी, मालेगाव, नाशिकमध्ये मुस्लिमांनी प्रचंड मोर्चे काढत जोरदार आंदोलन केलं आहे. आज अमरावतीतदेखील जोरदार आंदोलन पेटलं आहे. काल काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. जमावाने पोलिसांवरच दगडफेक केल्याने पोलिसांनीही जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला.

इतर बातम्या-

Pune Crime | किरण गोसावीच्या अडचणीत वाढ; दुबईवरून आलेल्या महिला साथीदाराला अटक

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.