Pune Crime | किरण गोसावीच्या अडचणीत वाढ; दुबईवरून आलेल्या महिला साथीदाराला अटक

कुसुम गायकवाड दुबईहून परत येताच मोठ्या शिताफीने लष्कर पोलिसांनी तिला अटक केली. किरण गोसावीची सहकारी असलेल्या कुसुम यांच्यावरही शिवराज जामदार या तरुणांकडून 1 लाख30 हजार रुपये घेण्यात आल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या कुसुम यांच्याकडून महत्त्वाचाही माहिती समोर येणाची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Pune Crime | किरण गोसावीच्या अडचणीत वाढ; दुबईवरून आलेल्या महिला साथीदाराला अटक
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावीला अटक
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 10:33 AM

पुणे- स्टारकिड्स आर्यन खान (Aryan Khan)ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या किरण गोसावी (kiran Gosavi) आणखी गोत्यात आला आहे. काल पिंपरी- चिंचवड येथे नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला असतानाच, दुसरीकडं या फसवणूक प्रकरणात त्याची साथीदार असलेल्या कुसुम गायकवाडला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे.

कुसुम गायकवाड दुबईहून परत येताच मोठ्या शिताफीने लष्कर पोलिसांनी तिला अटक केली. किरण गोसावीची सहकारी असलेल्या कुसुम यांच्यावरही शिवराज जामदार या तरुणांकडून 1 लाख 30 हजार रुपये घेण्यात आल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या कुसुम यांच्याकडून महत्त्वाचाही माहिती समोर येणाची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. लष्कर पोलिसांनी यापूर्वीही गोसावीची महिला साथीदार शेरबानो कुराशीला अटक केली आहे.

गोसावीवर फसवणुकीचे 10 गुन्हे दाखल

किरण गोसावीवर नोकरीचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक केल्याचे पुण्यात चार , पिंपरी चिंचवडमध्ये एक गुन्हा दाखल झाला आहे. राज्याच्या इतर भागातून पाच गुन्हे दाखल झाले आहेत. पुण्यातील फरासखाना पोलीस स्थानकात तीन वर्षांपूर्वी गोसावीवर फसवणुकीचा पहिला गुन्हा नोंद झाला होता. ज्या ज्या नागरिकांची किरण गोसावीने फसवणूक केली आहे त्यांनी न घाबरता पुढं येऊन तक्रारी दाखल करव्यात असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

के. पी. गोसावी नेमका कोण? कथित एनसीबी अधिकारी म्हवणारा किरण गोसावी हे देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के.पी.जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी यांची ओळख आहे.

हे ही वाचा

‘रंग दे बसंती’ ची कथा चोरल्याच्या आरोपातून दिग्दर्शक राकेश मेहरा दोषमुक्त, औरंगाबाद कोर्टाचा निकाल

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट? मुंबई सेंट्रल आगारातून पहिली एसटी धावली; राज्यात 826 एसटी रस्त्यावर

जालन्यात 9 टन लिंबाची लाकडे, 3 लाखांचा मुद्देमाल ताब्यात, वनविभागाची कारवाई

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.