AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रंग दे बसंती’ ची कथा चोरल्याच्या आरोपातून दिग्दर्शक राकेश मेहरा दोषमुक्त, औरंगाबाद कोर्टाचा निकाल

औरंगाबादचे मुश्ताक मोहसीन मुबारक हुसेन यांनी याचिका दाखल केली होती. हुसेन यांनी आपण इंडियन फिल्म रायटर्स असोसिएशनचे सदस्य असून 'इन्कलाब' नावाच्या चित्रपटाची कथा लिहिली होती. तसेच ती असोसिएशनकडे रजिस्टर्ड केल्याचा दावाही केला होता.

'रंग दे बसंती' ची कथा चोरल्याच्या आरोपातून दिग्दर्शक राकेश मेहरा दोषमुक्त, औरंगाबाद कोर्टाचा निकाल
औरंगाबादमधील लेखकाने कथा चोरल्याचा केला होता आरोप
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 12, 2021 | 6:04 PM
Share

औरंगाबादः ‘रंग दे बसंती’ (Rang De Basanti) चित्रपटाचे कथानक दिग्दर्शक राकेश मेहरा यांनी आपल्या स्क्रिप्टवरून चोरल्याचा आरोप औरंगाबादमधील एका व्यक्तीने केला होता. 2008 मध्ये या व्यक्तीने प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे राकेश मेहरांविरोधात याचिकाही दाखल केली होती. नुकताच कोर्टाने या प्रकरणी निकाल दिला असून संबंधित व्यक्तीची याचिका कोर्टाने फेटाळली. तसेच दिग्दर्शक राकेश मेहरा यांना दोषमुक्त ठरवले आहे. या प्रकरणी मेहरा (Rakesh Mehra) यांच्या वतीने अॅड. दीपक मनोरकर यांनी काम पाहिले.

‘इन्कलाब’  चित्रपटाची कथा चोरल्याचा होता आरोप

या प्रकरणी औरंगाबाद शहरातील मुश्ताक मोहसीन मुबारक हुसेन यांनी याचिका दाखल केली होती. हुसेन यांनी आपण इंडियन फिल्म रायटर्स असोसिएशनचे सदस्य असून ‘इन्कलाब’ नावाच्या चित्रपटाची कथा लिहिली होती. तसेच ती असोसिएशनकडे रजिस्टर्ड केल्याचा दावाही केला होता. 1999 साली आपण दिग्दर्शक राकेश मेहरा यांना ही कथा ऐकवली होती. या कथेवर 2006 मध्ये मेहरा यांनी ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट तयार केला, असा आरोप हुसेन यांनी केला. 2008 मध्ये हुसेन यांनी मेहरा यांच्याविरोधात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मेहरा यांच्या वतीने अॅड. दीपक मनोरकर यांनी कोर्टात बाजू मांडली.

मूळची कथा रजिस्टर्ड नाही, असा युक्तीवाद

या प्रकरणी अॅड. मनोरकर यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, हुसेन यांनी काही दिग्दर्शकांवर चुकीचे आरोप केलेले असून कोर्टाने या सर्वांना दोषमुक्त केल्याचे निदर्शनास आणून दिले. कोर्टाने हा युक्तीवाद मान्य करीत राकेश मेहरा यांना दोषमुक्त ठरवत हुसेन यांची याचिका निकालात काढली.

इतर बातम्या-

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट? मुंबई सेंट्रल आगारातून पहिली एसटी धावली; राज्यात 826 एसटी रस्त्यावर

धक्कादायकः अडीच दिवसाला बलात्कार, 6 दिवसाला खून, बीडचा क्राइम रेट घातकच!

Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती