डॉक्टर-इंजिनिअरपेक्षाही तगडा पगार, कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सुलभाला 46.27 लाखांचं पॅकेज

| Updated on: Jan 01, 2021 | 1:28 PM

गुजरातच्या निरमा विद्यापीठात बीटेकच्या अंतिम वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या सुलभा गर्गने (Sulbha Garg) 46.27 लाख वार्षिक पगाराची नोकरी पटकावली

डॉक्टर-इंजिनिअरपेक्षाही तगडा पगार, कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सुलभाला 46.27 लाखांचं पॅकेज
Follow us on

अहमदाबाद : कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आणि अनेक जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अशातच गुजरातमधील निरमा विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने घसघशीत वार्षिक पॅकेज मिळवलं आहे. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये बीटेकच्या अंतिम वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या सुलभा गर्गने (Sulbha Garg) 46.27 लाख वार्षिक पगाराची नोकरी पटकावली. (Nirma University Student Sulbha Garg bags 46 lakhs annual package in an IT Company)

सुलभा गर्ग निरमा युनिव्हर्सिटीत कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग (बीटेक) या विषयात पदवी शिक्षण घेत आहे. बंगळुरु स्थित एका आयटी कंपनीने कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सुलभाची निवड केली. सुलभा जानेवारी महिन्यापासूनच कंपनीत इंटर्नशीप सुरु करत आहे. तर पुढच्या वर्षी पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयटी डेव्हलपर म्हणून जॉईन हणार आहे.

“मी यासाठी खूप आधीपासूनच तयारी करत होते. मला चांगल्या पॅकेजची अपेक्षा होतीच” अशी प्रतिक्रिया सुलभाने ‘अहमदाबाद मिरर’ला दिली आहे. अर्थव्यवस्था कोलमडली असताना सुलभा तिच्या बॅचमध्ये सर्वात तगडं पॅकेज घेणारी विद्यार्थिनी ठरली आहे.

सुलभाचं निवड प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडली. सर्वात आधी तिची ऑनलाईन चाचणी झाली. त्यानंतर ती तांत्रिक फेऱ्यांना सामोरी गेली. तर तिसरी फेरी होती कल्चरल फिटची. निरमा विद्यापीठाने खास क्लासेस घेऊन विद्यार्थ्यांची तांत्रिक कौशल्यं विकसित केली. विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करुन त्यांना योग्य मार्गदर्शन केल्याचं प्राध्यापकांनी सांगितलं.

कल्चरल फिट फेरीत काय

प्लेसमेंटच्या वेळी घेतलेल्या कल्चरल फिट या तिसऱ्या फेरीत आयटी कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. कंपनी कल्चरसोबत विद्यार्थी कशा पद्धतीने जुळवून घेऊ शकतात, याविषयी चाचपणी करण्यात आली. सुलभाने या तिन्ही फेऱ्यांमध्ये उत्तम कामगिरी करत आयटी डेव्हलपरची पोझिशन मिळवली.

“आमच्या विद्यापीठासाठी हा परमोच्च आनंदाचा क्षण आहे. आमचे फॅकल्टी मेंबर्स आणि विद्यार्थ्यांची ही एकत्रित मेहनत आहे. आमचे विद्यार्थी कॉर्पोरेट विश्वाचा भाग होण्यास सक्षम असल्याचा आम्हाला आनंद आहे.” अशी प्रतिक्रिया आयटीएनयूचे इनचार्ज आर एन पटेल यांनी दिली.

संबंधित बातम्या :

कराडच्या प्रगती शर्माचा डंका, ‘कॅम्पस’मध्ये 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज

(Nirma University Student Sulbha Garg bags 46 lakhs annual package in an IT Company)