AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PNB Jobs : आत्मनिर्भर व्हायचं ! परीक्षा द्यायची, सिलेक्ट व्हायचं !! अर्ज आणि परीक्षा दोन्ही ऑनलाईन

या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अधिक माहितीसाठी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. वयाची अट, शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे आणि वयाच्या अटीत मागासवर्गीय प्रवर्गाला नियमानुसार सूट देण्यात आलेली आहे.

PNB Jobs : आत्मनिर्भर व्हायचं ! परीक्षा द्यायची, सिलेक्ट व्हायचं !! अर्ज आणि परीक्षा दोन्ही ऑनलाईन
पंजाब नॅशनल बँकImage Credit source: facebook
| Updated on: May 03, 2022 | 5:43 PM
Share

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी बंपर भरती (Recruitment) सुरु केली आहे. बँकेत नोकरी (Bank Jobs) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एकूण 145 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. या पदांसाठीची अर्जाची शेवटची तारीख 7 मे 2022 आहे. योग्य उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. परीक्षा 12 जून 2022 रोजी होणार आहे. या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अधिक माहितीसाठी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. वयाची अट, शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे आणि वयाच्या अटीत मागासवर्गीय प्रवर्गाला नियमानुसार सूट देण्यात आलेली आहे.

View this post on Instagram

A post shared by Asian News International (@ani_trending)

अर्ज कसा करावा

  • अर्ज करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या pnbindia.in अधिकृत वेबसाईटला जायचं
  • वेबसाईटच्या होम पेजवर रिक्रूटमेंट्स / करियर वर क्लिक करा
  • यामध्ये तज्ञ अधिकारांच्या 145 पदांसाठीच्या भरतीच्या लिंकवर क्लिक करा
  • अर्ज सुरु झाले कि तिथे ऑनलाईन अर्ज भरता येतील
  • अर्ज भरण्यापूर्वी नोंदणी करावी लागते
  • नोंदणी केली कि तुम्ही अर्ज भरू शकता
  • पदांचं नाव आणि उपलब्ध जागा
  • एकूण जागा 145

मॅनेजर (रिस्क) – 40

मॅनेजर (क्रेडिट) – 100

सिनिअर मॅनेजर (ट्रेझरी) – 05

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

एमबीए इन फायनान्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्स असलेले उमेदवार पीएनबीमध्ये मॅनेजर पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. भरती अधिसूचनेतील तपशीलवार शैक्षणिक पात्रता पहा. व्यवस्थापक पदांसाठी 1 वर्षाचा अनुभव आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी किमान 3 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

महत्त्वाचे

नोकरीचं ठिकाण – संपूर्ण भारत

निवड करण्याची पद्धत – ऑनलाईन परीक्षा, मुलाखत

ऑनलाईन परीक्षा – 12 जून 2022

अर्ज करायची शेवटची तारीख – 7 मे 2022

अधिकृत वेबसाईट – pnbindia.in

Notification – Click Here

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

महत्त्वाची बातमी

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.