PMC Recruitment 2022: पुणे महानगरपालिकेत बंपर भरती! वाचा रिक्त जागांचा तपशील, शेवटची तारीख वगैरे वगैरे

| Updated on: Jul 21, 2022 | 10:37 AM

PMC Recruitment 2022: एकूण रिक्त पदांपैकी लिपिक टंकलेखक 200, कनिष्ठ अभियंता (जेई) साठी 144, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक 100 आणि सहाय्यक विधी अधिकारी पदांसाठी 4 रिक्त जागा आहेत.

PMC Recruitment 2022: पुणे महानगरपालिकेत बंपर भरती! वाचा रिक्त जागांचा तपशील, शेवटची तारीख वगैरे वगैरे
LIC HFL Recruitment
Image Credit source: Social Media
Follow us on

PMC Recruitment 2022: पुणे महानगरपालिका (PMC) सामान्य प्रशासन विभागांतर्गत सहाय्यक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यासारख्या विविध वर्ग 2 आणि वर्ग 3 च्या पदांच्या 448 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्जाची लिंक अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच pmc.gov.in उपलब्ध आहे. पीएमसी ऑनलाइन अर्ज 20 जुलै 2022 पासून उपलब्ध असेल. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी (Candidates) अंतिम दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. एकूण रिक्त पदांपैकी लिपिक टंकलेखक 200, कनिष्ठ अभियंता (जेई) साठी 144, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक 100 आणि सहाय्यक विधी अधिकारी पदांसाठी 4 रिक्त जागा आहेत.

पीएमसी रिक्रूटमेंट 2022 शी संबंधित अधिक माहिती:

पीएमसी भरती सूचना डाउनलोड करा

भरतीसाठीची वयोमर्यादा

पुणे महानगरपालिकेनं जारी केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं कमीत कमी वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 38 वर्ष असावं

महत्त्वाच्या तारखा

  1. पीएमसी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात – 20 जुलै 2022
  2. पीएमसी ऑनलाइन नोंदणी शेवट – 10 ऑगस्ट 2022
  3. अर्ज छपाईची शेवटची तारीख-  25 ऑगस्ट 2022
  4. ऑनलाइन फी भरणा- 20 जुलै 2022 ते 10 ऑगस्ट 2022

पीएमसी रिक्त जागा तपशील

असिस्टेंट लीगल ऑफिसर – 04
क्लर्क टंकलेखक – 200
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल)- 135 पदे .
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल)- 05 पदे
कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन)- 04 पदे .
सहायक अतिक्रमण निरीक्षक – 100

पीएमसी भरती 2022 साठी अर्ज कसा करावा?

पात्र आणि इच्छुक उमेदवार 20 जुलै 2022 ते 10 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया

या पदांवरील निवड

  • लेखी चाचणी
  • मुलाखत
  • टायपिंग चाचणी
  • कागदपत्र पडताळणी इत्यादीद्वारे केली जाईल

अर्ज शुल्क

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावं लागेल. दुसरीकडे, आरक्षित प्रवर्गासाठी 800 रुपये शुल्क