नोकरीच्या शोधात आहात? मग लगेचच करा अर्ज, दहावी पास ते पदवीधरांसाठी अत्यंत मोठी संधी, थेट

Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

नोकरीच्या शोधात आहात? मग लगेचच करा अर्ज, दहावी पास ते पदवीधरांसाठी अत्यंत मोठी संधी, थेट
Bank Note Paper Mill India Limited
| Updated on: Jun 13, 2024 | 11:27 AM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. बँक नोट पेपर मिल इंडिया लिमिटेड यांच्याकडून ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागतील. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

बँक नोट पेपर मिल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया एकून 39 जागांसाठी सुरू आहे. प्रक्रिया सहाय्यक श्रेणी – I (नॉन-एक्झिक्युटिव्ह कॅडर) ची पदे भरली जातील. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल, पल्प अँड पेपर, सिव्हिल, केमिस्ट्री, अकाउंट्स असिस्टंट अशी वेगवेगळी पदे भरली जातील.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा द्यावी लागेल. हेच नाही तर गरज पडल्यास उमेदवारांना कौशल्य चाचणी देखील द्यावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार असणार आहे. यांत्रिक विषयासाठी ITI ट्रेड सर्टिफिकेट असलेले आणि किमान दोन वर्षे या क्षेत्रात काम केलेला 10वी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतो. 18 ते 28 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही bnpmindia.com. या साईटवर मिळेल. याच साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 600 रूपये फीस ही लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. खरोखरही ही नक्कीच मोठी संधी म्हणावी लागणार आहे.