Bank Job 2021 : बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजरच्या 511 पदांवर भरती, असा करा अर्ज

केवळ फायनान्स सर्विसचा अनुभव असलेले उमेदवारच अर्ज करू शकतात. याशिवाय संबंधित क्षेत्रात दोन वर्षांचे मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे अनिवार्य आहे. (Recruitment for 511 posts of Manager in Bank of Baroda, apply immediately)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:47 PM, 10 Apr 2021
Bank Job 2021 : बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजरच्या 511 पदांवर भरती, असा करा अर्ज
बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजरच्या 511 पदांवर भरती

Bank Job 2021 नवी दिल्ली : सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदा(Bank of Baroda)ने मॅनेजर पदासाठी बंपर भरती जारी केली आहे. या रिक्त जागेसाठी (Bank Manager Recruitment 2021) एकूण 511 पदांसाठी भरती करण्यात येईल. अशा परिस्थितीत बँक मॅनेजर पदासाठी इच्छुक उमेदवार बँक ऑफ बडोदाचे अधिकृत संकेतस्थळ bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Recruitment for 511 posts of Manager in Bank of Baroda, apply immediately)

अर्ज कसा करावा?

व्यवस्थापक पदासाठी जारी केलेल्या या भरतीसाठी उमेदवारांना खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करावे लागेल.

– प्रथम bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
– मुख्यपृष्ठावरील Career विभागावर क्लिक करा.
– करिअर विभागात असलेल्या Recruitment Project विभागावर क्लिक करा.
– यामध्ये “Recruitment for Wealth Management Services Department” या लिंकवर क्लिक करा.
– आता Link to Apply वर जा.
– पुढील पानावर Application form ओपन होईल.
– येथे आवश्यक तपशील भरा आणि सबमिट करा.
– शेवटी निश्चित फी जमा करुन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
– डायरेक्ट लिंकद्वारे अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

कोण अर्ज करू शकेल?

या भरती अंतर्गत (Bank Manager Job) विविध पदांसाठी भरती केली जाईल. यामध्ये सर्वाधिक भरती व्यवस्थापक पदासाठी आहे. मॅनेजरच्या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी पूर्ण केलेली असली पाहिजे. तसेच, केवळ फायनान्स सर्विसचा अनुभव असलेले उमेदवारच अर्ज करू शकतात. याशिवाय संबंधित क्षेत्रात दोन वर्षांचे मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे अनिवार्य आहे. उमेदवारांकडून एनआयएसएम / आयआरडीएकडे नियामक प्रमाणपत्र मागितले गेले आहे. पात्रतेच्या व वयोमर्यादेच्या पूर्ण तपशीलांसाठी या लिंकवर क्लिक करा.

या पदांवर होईल भरती

या भरतीमध्ये एकूण व्यवस्थापकांच्या 511 पदांवर भरती होईल. यामध्ये पुढील पोस्ट निश्चित केल्या आहेत.

सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर – 407 पद

ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 50 पद

टेरीटरी हेड – 44 पद

ग्रुप हेड – 6 पद

प्रोडक्ट हेड (Investment & Research) – 1 पद

हेड (Operation & Technology) – 1 पद

डिजिटल सेल्स मॅनेजर – 1 पद

आयटी फंक्शनल एनालिस्ट-मॅनेजर – 1 पद (Recruitment for 511 posts of Manager in Bank of Baroda, apply immediately)

इतर बातम्या

पूर्ण लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Partnered : True 48MP Quad Cam, Samsung Galaxy F12 बाजारात, 12 एप्रिलपासून विक्री