भिवंडी महानगरपालिकेत भरती प्रक्रिया सुरू, अशाप्रकारे आजच करा अर्ज, तब्बल..
मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. थेट भिंवडी महापालिकेत ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवाराने उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे सुरू आहे. नोकरीच्या शोधात असाल तर उशीर न करता आपण आपले अर्ज लगेचच भरावेत.
मुंबई : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय, लगेचच इच्छुकांनी अर्ज करा. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे करावे लागतील. उमेदवारांनी अजिबात उशीर न करता लगेचच अर्ज हा करावा. नुकताच या रिक्त पदांबद्दल एक जाहिरात ही महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेचा अर्ज इच्छुकांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मात्र, अर्ज करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुट्टीचा दिवस वगळून हा अर्ज करावा लागणार आहे. चला तर मग आता शेवटच्या तारखेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत, लवकरात लवकर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा आणि मिळवा नोकरी. ही भरती प्रक्रिया सहा पदांसाठी पार पडत आहे.
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेकडून रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. टी. बी. हेल्थ व्हिजीटर एकून जागा 3, प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकून जागा 1आणि वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक एकून जागा 2 या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत, वैद्यकीय आरोग्य विभाग, भिवंडी, जि. ठाणे याठिकाणी करावा लागणार आहे. उमेदवाराने शेवटच्या तारखेच्या आत आपले अर्ज या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. जर अर्ज पाठवण्यास उशीर झाला तर आपला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाहीये.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने संबंधित माहिती व्यवस्थितपणे तपासणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील ठेवण्यात आलीये. उमेदवाराचे वय हे 40 असावे अशी अट ठेवण्यात आली आहे. नोकरीचे ठिकाण हे भिवंडीच असणार आहे. अर्ज स्वीकारण्याची वेळ ही सकाळी 9.30 ते 5 पर्यंतच असणार आहे.