आयकर विभागामध्ये बंपर भरती, दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी

| Updated on: Dec 14, 2023 | 12:34 PM

आयकर विभागामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल. आता उशीर न करता नोकरीच्या शोधात असलेल्यांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज हे करावे. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत.

आयकर विभागामध्ये बंपर भरती, दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी
Follow us on

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ही एक बंपर भरतीच आहे. उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जवळ आहे. यामुळे अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज दाखल करा. आयकर विभागामध्ये नोकरी करण्याची ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. 16 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत.

16 जानेवारी 2024 नंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळे उमेदवारांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. ही भरती एकून 55 पदांसाठी होत आहे. यामध्ये प्रामुख्याने आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड 2 तसेच मल्टी टास्किंग स्टाफ या जागा या भरती प्रक्रियेतून भरल्या जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक पदासाठी शिक्षणाची अट ही वेगळी असणार आहे. दहावी पास, बारावी पास आणि पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हे करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी incometaxrajasthan.gov.in. या साईटवर तुम्हाला जावे लागेल.

incometaxrajasthan.gov.in. वर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. इच्छुक उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही मोठी संधीच असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 18 असावे तसेच उमेदवाराचे वय हे 30 च्या पुढे नसावे.

या भरती प्रक्रियेत मार्कनुसार उमेदवाराची निवड ही केली जाईल. उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. आयकर विभागामध्ये काम करण्याचे तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते.