AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Jobs : दहावी, बारावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, आताच करा अर्ज…

रेल्वेमध्ये नोकरी शोधत असलेल्या व्यक्तींकरिता सुवर्णसंधी आहे. जर आपल्याला रेल्वेमध्ये नोकरी करायची असेल तर दक्षिण रेल्वेच्या रिक्त झालेल्या जागांवर लवकरात लवकर अर्ज करा. (RRB Railway jobs opportunity 10th and 12th pass Student)

Railway Jobs : दहावी, बारावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, आताच करा अर्ज...
Railway
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 8:41 AM
Share

Railway Jobs : रेल्वेमध्ये नोकरी शोधत असलेल्या व्यक्तींकरिता सुवर्णसंधी आहे. जर आपल्याला रेल्वेमध्ये नोकरी करायची असेल तर दक्षिण रेल्वेच्या रिक्त झालेल्या जागांवर लवकरात लवकर अर्ज करा. कारण भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. दक्षिण रेल्वे 3,378 पदे भरती करत आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 आहे. या पदांवर भरतीसाठी दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी sr.indianrailways.gov.in वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. (RRB Railway jobs opportunity 10th and 12th pass Student)

पदांचा तपशील

कॅरेज वर्क्स, पेरंबूर – 936 जागा गोल्डनरोक वर्कशॉप – 756 जागा सिग्नल अँड टेलिकॉम वर्कशॉप, पोदानूर – 1686 जागा रिक्त पदांची एकूण संख्या-3378 जागा

कोण कोणत्या जागेसाठी करु शकतं अर्ज?

फिटर, पेंटर आणि वेल्डर या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह दहावी (मॅट्रिक) उत्तीर्ण केलेली असावी. मेडिकल लॅब टेक्निशियन (रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, कार्डियोलॉजी) पदांसाठी अर्ज करण्यासाठी पदवी, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात किमान 50० टक्के गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण असावी. तसेच मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय अभ्यासक्रम पास केलेला असावा.

वयाची मर्यादा?

फ्रेशर उमेदवार, आयटीआय, एमएलटी या उमेदवारांचं वय अनुक्रमे 22 आणि 24 वर्षांपेक्षा अधिक नसावं.

निवड कशी होणारय़

EX ITI प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड दहावी व आयटीआय मध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. त्याचबरोबर एमएलटी पदासाठी बारावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल.

असा करा अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवार sr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

(RRB Railway jobs opportunity 10th and 12th pass Student)

हे ही वाचा :

आंतरराष्ट्रीय योगदिनी योग विज्ञानात डिप्लोमा कोर्स सुरु, मंत्रीमहोदयांच्या हस्ते उद्घाटन

Delhi Police Constable Admit Card : शारीरिक चाचणीसाठी अ‍ॅडमिट कार्ड जारी, असं करा डाऊनलोड

NCPOR recruitment 2021: ध्रुवीय आणि महासागर संशोधन संस्थेत विविध पदांवर भरती, 56 हजारापर्यंत पगाराची संधी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.