
कलकत्ता : मायनिंग मध्ये डिग्री आणि डिप्लोमा केलेल्यांसाठी सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी ही संधी चांगली आहे. पश्चिम बंगाल पॉवर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (WBPDCL) ने सहाय्यक खाण प्रबंधकासहित विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी अर्ज करायचा असेल तर आजच कामाला लागा. 4 डिसेंबर 2023 पासून याची अर्ज करण्याची वेळ सुरू झाली असून 25 डिसेंबर 2023 ही अर्जासाठी शेवटची तारीख आहे. wbpdcl.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन कँडीडेट्स त्यांचा अर्ज सादर करू शकतात.
विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. सध्या एकूण 76 पदं रिकामी असून त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या रिकाम्या पदांपैकी सहाय्यक खाण प्रबंधकाच्या 46 जागा, कल्याण अधिकारी १ जागा, सर्व्हेअर साठी 7 जागा, ओव्हरमॅनसाठी 18 जागा, ज्यूनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल) च्या पदासाठी 2 जागा आणि ज्यूनिअर इंजिनिअर ( इलेक्ट्रिकल) 2 जागांचा समावेश आहे. या पदांसाठी काय योग्यता आहे आणि वयोमर्यादा किती आहे, ते जाणून घेऊया.
आवश्यक योग्यता
सहाय्यक खाण प्रबंधकाच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या कँडिडेट्सकडे मायनिंग इंजिनिअरिंगची डिग्री असली पाहिजे. कल्याण अधिकारी पदासाठी प्रोग्रॅम इन मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असली पाहिजे. तर सर्व्हेअर पदासाठी अर्ज करायचे असल्यास त्या उमेदवाराकडे संबंधित स्ट्रीमध्ये इंजिनिअरिग डिप्लोमा असला पाहिजे. ओव्हरमॅन पदासाठी मायनिंग मध्ये डिप्लोमा असला पाहिजे. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार हे संबंधित विभागाची जाहिरात चेक करू शकतात.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 55 पेक्षा अधिक नसावे,
या स्टेप्स फॉलो करून भरा अर्ज
– wbpdcl.co.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
– होम पेजवर असलेल्या करिअर टॅबवर क्लिक करावे.
– तिथे संबंधित भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी त्या लिंकवर क्लिक करा.
– आता तिथे विचारलेली संपूर्ण माहिती नीट भरा आणि अर्ज समबिट करा.
परीक्षेविना होणार निवड
या सर्व पदासांठी उमेदवारांची निवड ही मुलाखत अथवा इंटरव्ह्यू घेऊन केली जाईल. मुलाखतीच वेळ आणि स्थान याचंची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. तीन वर्षांसाठी ही नियुक्ती केली जाईल.