अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका संकेतस्थळावर मिळणार, पारदर्शकतेसाठी निर्णय

| Updated on: Oct 22, 2021 | 9:39 PM

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेतील उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, देण्यात आलेले गुण अशी सर्व माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे उमेदवाराला आपल्या गुणांकणाचे विश्लेषण करता येईल.

अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका संकेतस्थळावर मिळणार, पारदर्शकतेसाठी निर्णय
एमपीएससी
Follow us on

मुंबई : स्पर्धा परीक्षेच्या आयोजनापासून ते निकालापर्यंत पारदरर्शकता राहावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेतील उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, देण्यात आलेले गुण अशी सर्व माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे उमेदवाराला आपल्या गुणांकणाचे विश्लेषण करता येईल.

मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत संकेतस्थळावर उपलब्ध

मागील अनेक दिवसांपासून भरती प्रक्रिया बंद असल्यामुळे राज्य सरकारवर टीका केली जात होती. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तसेच मागील काही महिन्यांत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर करताना जास्तीत जास्त पारदर्शकता ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेतील उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत तसेच दिलेले गुण एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ही परीक्षा 27 मार्च रोजी घेण्यात आली होती. उमेदवारांना https://mpsc.gov.in या वेबसाईटवर स्कॅन प्रत पाहता येईल. पारदर्शकता ठेवण्यासाठी आयोगाने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे.

निर्णयाचे उमेदवारांकडून स्वागत

आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांना आपली उत्तरपत्रिका कशाप्रकारे तपासण्यात आलेली आहे. तसेच किती गुण देण्यात आले आहेत. हे प्रत्यक्ष पाहता येणार आहे. या निर्णयाचे परीक्षार्थींकडून स्वागत करण्यात आले आहे.

पीएसआय पदाच्या शारीरिक चाचणी, मुलाखतीच्या तारखा जाहीर

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (महाराष्ट्र दुय्यम सेवा) पीएसआय पदाच्या शारीरिक चाचणीच्या आणि मुलाखतीच्या तारखा केल्या जाहीर केल्या होत्या. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान पुणे नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी पीएसआय पदासाठी पहिल्या टप्प्यातील शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे, यांसंदर्भातील तपशीलवार कार्यक्रम आयोगानं जाहीर केला आहे. शारीरिक चाचणीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना मैदानी आणि शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करिता शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कोल्हापूर, नाशिक व पुणे येथील पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमदेवारांची शारिरीक चाचणी पुणे, कोल्हापूर आणि नाशिक इथं घेण्यात येईल.

इतर बातम्या :

मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा फोन, अजित पवार पुणे दौरा रद्द करुन थेट मुंबईच्या दिशेला रवाना

MPSC Exam: मोठी बातमी, राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर

MPSC Update : एमपीएससीकडून 2019 च्या PSI परीक्षेचा शारीरिक चाचणीसह मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर, उमदेवारांना दिलासा

(Scan image of original answer sheet of candidates appeared for Maharashtra Civil Engineering Preliminary Examination is available on mpsc gov in)