AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Exam: मोठी बातमी, राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज दाखल करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती

MPSC Exam: मोठी बातमी, राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर
MPSC EXAM
| Edited By: | Updated on: Oct 20, 2021 | 6:04 PM
Share

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज दाखल करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती.एमपीएससीकडून अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवार आता राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

एमपीएससीकडून नवं परिपत्रक

आज एमपीएससीनं नवीन परिपत्रक काढत अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिल्याचं जाहीर केलं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. एकूण 20 संवर्गातील 390 पदांची जाहिरात आली आहे. विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

2 जानेवारीला होणार एमपीएससीची पूर्वपरीक्षा

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

राज्य सेवा परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक काय?

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. 2021 च्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

पदांचा तपशील

उपजजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16 , गटविकास अधिकारी 15, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ 15, उद्योग उप संचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहायक गटविकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15 , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर 1, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1,सहकारी कामगार अधिकारी 54,  मुख्याधिकारी गट ब 75, मुख्याधिकारी गट अ 15 पदं, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ 10 पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

इतर बातम्या:

MPSC Exam : तयारीला लागा! महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षेसंदर्भात आयोगाकडून महत्त्वाची अपडेट

MPSC : सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी अर्ज करा, पूर्व परीक्षेच्या सुधारित निकालानंतर आयोगाचं आवाहन

Maharashtra Public Service Commission extend last date for applications of state service exam 2021

अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे
नियोजनाच्या बाबतीत अजित दादांचा हात कोणीही धरु शकत नाही: अंकूश काकडे.