AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : पत्नीच्या त्या एका प्रश्नाने बदलून टाकलं सूर्यकुमार यादवचं करिअर, वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टनचा खुलासा

Suryakumar Yadav Career Changed After One Question From Wife Devisha : सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा सोबतची बाँडिंग सगळ्यांना माहित आहे. सूर्यकुमार यादव आज जे काही आहे, त्याच श्रेय बऱ्याच प्रमाणात पत्नी देविशाला जातं. पत्नीसोबतच्या अशाच एका चर्चेने त्याचं करिअर कसं बदलून टाकलं, त्याचा खुलासा एका मुलाखतीत सूर्यकुमार यादवने केला.

Suryakumar Yadav : पत्नीच्या त्या एका प्रश्नाने बदलून टाकलं सूर्यकुमार यादवचं करिअर, वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टनचा खुलासा
Suryakumar Yadav Image Credit source: instagram
| Updated on: Mar 19, 2026 | 12:55 PM
Share

टीम इंडियाने नुकताच सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचं कॅप्टन बनण्याचं भाग्य सूर्यकुमार यादवला लाभलं. सूर्यकुमार यादवने आज हा जो टप्पा गाठलाय, त्याच श्रेय बऱ्याच प्रमाणात त्याच्या पत्नील जातं. पत्नीच्या एका साध्या सरळ प्रश्नामुळे त्याने भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं. सूर्यकुमार यादवच्या पत्नीच नाव देविशा आहे. पत्नीच्या प्रश्नामुळे सूर्यकुमार यादवला कठोर मेहनत करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे आज तो जिथे आहे, त्याचं श्रेय पत्नीला जातं. वर्ष 2018 मध्ये देविशाने सूर्यकुमार यादवला एक प्रश्न विचारला. तुला भारतासाठी खेळायचं असेल, तर तुझी काय योजना आहे? त्या एका प्रश्नाने सूर्यकुमारच आयुष्य बदलून टाकलं. आज निकाल आपल्या सर्वांसमोर आहे.

पीटीआय व्हिडिओ सोबत एका पॉडकास्टमध्ये सूर्यकुमार यादवने त्या चर्चेबद्दल खुलासा केला. “आमचं लग्न 2016 साली झालं. त्यावेळी मी केकेआरसाठी खेळत होतो. सर्वकाही व्यवस्थित सुरु होतं. मी चांगला खेळत होतो. खेळाचा आनंद लुटत होतो. 2018 मध्ये मी मुंबई इंडियन्सचा भाग बनलो” “एकदिवस पत्नी त्याला म्हणाली की, तुझ्यासोबत एज ग्रुपमध्ये खेळणारे सर्व खेळाडू आता भारतासाठी खेळत आहेत. तुझ्या मनात काय आहे?. मी म्हटलं, मला सुद्धा भारतासाठी खेळायचं आहे. तिने विचारलं कसं खेळणार?” असं सूर्यकुमार त्या पॉडकास्टमध्ये म्हणाला.

तर मी हे कसं करणार?

35 वर्षीय सूर्यकुमार यादवने पत्नीसोबत करिअर बदलून टाकणारी जी चर्चा झाली, त्या बद्दल सांगितलं. “ती संक्षिप्त चर्चा होती. कुठला वाद त्यात नव्हता. पण निश्चितपणे त्या चर्चेच सार असं होतं की, तुम्ही तुमच्या लक्ष्याच्या दिशेने एक पाऊल पुढे कसं टाकणार. मला भारतासाठी खेळायचं असेल, भारताला जिंकवून द्यायच असेल तर मी हे कसं करणार?” असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

आम्हाला अनेक गोष्टी कमी कराव्या लागल्या

“लक्ष्याच्या दिशेने प्रवास सुरु केल्यानंतर काही आव्हानं सुद्धा आली. पण सूर्यकुमार आणि देविशा एकत्रितपणे त्या मार्गावरुन वाटचाल करत राहिले. आम्हाला अनेक गोष्टी कमी कराव्या लागल्या. खाण्या-पिण्यापासून आठवड्यात मित्रांना भेटणं, शनिवार-रविवार आराम, सोमवारपासून शुक्रवारपर्यंत शेड्यूल होतं. आम्ही ही सुरुवात केली. 2018 च्या आयपीएलमध्ये 512 धावा करुन चांगली कामगिरी केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुद्धा मी चांगलं प्रदर्शन केलं होतं” असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात