MPSC Update : एमपीएससीकडून 2019 च्या PSI परीक्षेचा शारीरिक चाचणीसह मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर, उमदेवारांना दिलासा

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करिता शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कोल्हापूर, नाशिक व पुणे येथील पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

MPSC Update : एमपीएससीकडून 2019 च्या PSI परीक्षेचा शारीरिक चाचणीसह मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर, उमदेवारांना दिलासा
MPSC EXAM


मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (महाराष्ट्र दुय्यम सेवा) पीएसआय पदाच्या शारीरिक चाचणीच्या आणि मुलाखतीच्या तारखा केल्या जाहीर केल्या होत्या. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी पीएसआय पदासाठी पहिल्या टप्प्यातील शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे, यांसंदर्भातील तपशीलवार कार्यक्रम आयोगानं जाहीर केला आहे. शारीरिक चाचणीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना मैदानी आणि शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक करिता शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कोल्हापूर, नाशिक व पुणे येथील पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमदेवारांची शारिरीक चाचणी पुणे, कोल्हापूर आणि नाशिक इथं घेण्यात येईल.

कोल्हापूर

पोलीस मुख्यालय ग्राऊंड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे 16 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत सकाळी 6.30 मिनिटांनी उमेदवारांनी हजर राहावे.

पुणे

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 1, रामटेकडी, हडपसर, पुणे पोलीस मुख्यालय ग्राऊंड,  येथे 16 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, 6 ते 9 डिसेंबर या कालावधीत सकाळी 6.30 मिनिटांनी उमेदवारांनी हजर राहावे.

नाशिक

महाराष्ट्र पोलीस अकादमी. त्र्यंबक रोड. नाशिक येथे 16 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत सकाळी 6.30 मिनिटांनी उमेदवारांनी हजर राहावे.

496 पदांसाठी राबवली जाणार शारीरिक चाचणीची प्रक्रिया

तब्बल दोन वर्षानंतर एमपीएससीने ( महाराष्ट्र दुय्यम सेवा ) पीएसआय पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीची तारीख जाहीर केली आहे. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोना, आरक्षणाचा मुद्दा तसेच एमपीएससीच्या दिरंगाईपणामुळे ही भरती प्रक्रिया लांबली होती. मात्र आता शेवटी आयोगाना पीएसआय पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 19 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान पुणे, नाशिक, आणि कोल्हापूर या शहरांत शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. 496 पदांसाठी ही शारीरिक चाचणीची प्रक्रिया राबवली जात आहे. उर्वरित टप्प्यातील उमेदवारांचा शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम नंतर जाहीर केला जाणार आहे.

राज्य सेवेचे अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज दाखल करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती.एमपीएससीकडून अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवार आता राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

इतर बातम्या:

MPSC Exam : तयारीला लागा! महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षेसंदर्भात आयोगाकडून महत्त्वाची अपडेट

MPSC : सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी अर्ज करा, पूर्व परीक्षेच्या सुधारित निकालानंतर आयोगाचं आवाहन

Maharashtra Public Service Commission extend last date for applications of state service exam 2021

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI