AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC CGL 2020 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीजीएल परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर, उत्तरतालिका प्रसिद्ध

स्टाफ सिलेक्शन कमिशननं कंबाइंड ग्रॅज्युएशन लेवल म्हणजेच सीजीएल 2020 च्या टीयर 1 च्या परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

SSC CGL 2020 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीजीएल परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर, उत्तरतालिका प्रसिद्ध
ssc
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Sep 09, 2021 | 11:11 AM
Share

SSC CGL Recruitment 2020 नवी दिल्ली: स्टाफ सिलेक्शन कमिशननं कंबाइंड ग्रॅज्युएशन लेवल म्हणजेच सीजीएल 2020 च्या टीयर 1 च्या परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एसएससीनं बुधवारी एक नोटिफिकेशन जारी करुन सीजीएल आणि सीएचएसएल परीक्षाचा निकाल 11 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याची घोषणा केली आहे. सीजीएल परीक्षा 2020 टियर 1 चं आयोजन 13 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल सीजीएल 2020 च्या टीयर 1 परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. आयोगाकडून लवकरच अंतिम उत्तर तालिका जाहीर केली जाणार आहे. 11 डिसेंबरला टीयर 1 च्या निकालामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना टीयर 2 ची परीक्षा द्यावी, लागणार आहे.

6506 पदांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशननं जारी केलेल्या नोटिफिकेशनुसार 13 ते 24 ऑगस्ट दरम्यान परीक्षेचं आयोजन केलं करण्यात आलं आहे आहे. एकूण 6506 पदांसाठी सीजीएल परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या टीयर मधील उत्तीर्ण उमेदवार दुसऱ्या टीयरसाठी पात्र ठरतील.

परीक्षेचं स्वरुप

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीजीएलच्या टियर 1 परिक्षेत 100 प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित कऱण्यात आली होती. यामध्ये चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग देखील केलं जातं. सामान्य ज्ञान, जनरल इंटेलिजन्स, इंग्रजी, गणितीय क्षमता यावर प्रश्न विचारले जातात. प्रत्येक विभागावर 25-25 प्रश्न विचारले जातात.

कोणत्या पदांवर भरती होणार?

सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी अन्वेषण ब्यूरो, सहायक विभाग अधिकारी रेल्वे मंत्रालय, सहायक विभाग अधिकारी परराष्ट्र, सहाय्यक इतर विभाग, आयकर निरीक्षक सीबीडीटी, निरीक्षक केंद्रीय उत्पादन शुल्क, निरीक्षक प्रतिबंधक अधिकारी, उपनिरीक्षक सीबीआय, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी महसूल विभाग, निरीक्षक टपाल विभाग, सहाय्यक इतर मंत्रालय या पदांसाठी परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

सीडॅक पुणे येथे 259 पदांवर भरती

पुणे: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‌ॅडव्हान्समेंट म्हणजेच सीडॅकच्या वतीनं पुणे येथील विविध पदांसाठी पदभरती जाहीर केली आहे. पात्र उमदेवार सीडॅकच्या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. प्रोजेक्ट इंजिनिअर्स, प्रोजेक्ट असोसिएट आणि प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकूण 259 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर आहे. सीडॅकमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं बी.ई.बी.टेक, एमसीए, एम.ई. एमएससी किंवा पीएजडी झालेलं असणं आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्ली, पुणे आणि हैदराबाद येथे नोकरीसाठी रुजू व्हावे लागेल.

इतर बातम्या:

Oil India Limited Recruitment 2021: ऑईल इंडियामध्ये 535 पदांसाठी भरती, 47 हजारांपर्यंत पगाराची संधी

CDAC Recruitment 2021: सीडॅक पुणे येथे 259 पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

SSC CGL Recruitment 2020 Exam SSC declared date for CGL Tier 1 Exam result Click here for more Details

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद