पोरांनो, शिक्षक भरतीसाठी सज्ज व्हा… लवकरच शिक्षक भरती, जाहिरात जारी, थेट इतक्या पदांसाठी..

| Updated on: Feb 05, 2024 | 5:51 PM

Teacher Recruitment 2024 : गेल्या काही दिवसांपासून शिक्षक भरतीची प्रतिक्षा केली जात होती. शेवटी आता शिक्षक भरतीची जाहिरात ही शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडून राबवण्यात येणारी ही भरती मेगा भरती नक्कीच आहे.

पोरांनो, शिक्षक भरतीसाठी सज्ज व्हा... लवकरच शिक्षक भरती, जाहिरात जारी, थेट इतक्या पदांसाठी..
Follow us on

मुंबई : नुकताच शिक्षक भरतीबद्दल मोठी बातमी पुढे येताना दिसतंय. गेल्या काही वर्षांपासून राज्यात शिक्षण भरती झाली नाहीये. उमेदवार गेल्या कित्येक दिवसांपासून शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत आहेत. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. थेट सरकारी नोकरी आणि शिक्षक होण्याचे स्वप्न आता अनेकांचे पूर्ण होणार आहे. नुकताच शिक्षण विभागाकडून शिक्षक भरती प्रक्रियेबद्दलची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेतून राज्यभरातील जिल्हा परिषद शाळा आणि शाजगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक भरली केली जाणार आहे.

शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी शिक्षण संस्थांसाठी ही जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांची शेवटी आता प्रतिक्षा संपल्याचे दिसतंय. खरोखरच ही मोठी संधी आहे.

शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्यांनी या लिंकवर जावे. या लिंकवर आपल्याला शिक्षक भरतीबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx ही लिंक ओपन करा येथे शिक्षक भरतीची जाहिरात आहे. ही जाहिरात तुम्ही डाऊनलोड देखील करू शकता.

पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 या संकेतस्थळावरील मुख्य बारवर होम, डाउनलोड आणि एफएक्यू देण्यात आले आहेत. त्यातील डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना मुलाखती शिवाय भरल्या जाणाऱ्या जागा आणि मुलाखती घेऊन भरल्या जाणाऱ्या जागा दिसून येतील. येथेच आपल्याला सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

यावरूनच हे स्पष्ट दिसेल की, कोणत्या जिल्ह्यात किती व कोणत्या संवर्गासाठी जागा आहेत. शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरती संदर्भातील पुढील माहिती आता लवकरच प्रसिद्ध केली जाईल. यानुसार तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. खरोखरच शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.