ट्विटरने हटवली ‘ब्लू टिक’वाली बोगस अकाऊंट्स; हजारो लोक करीत होते फॉलो

| Updated on: Jul 13, 2021 | 11:00 PM

सहा अकाऊंट्सपैकी दोन अकाऊंट्समध्ये लोकांचे फोटो त्यांच्या प्रोफाईल फोटोच्या रुपात आहेत. या सहा अकाऊंट्समध्ये 976 संशयित फॉलोअर्स आढळले आहेत. ही सर्व अकाऊंट्स 19 जून ते 20 जून यादरम्यान बनवण्यात आली होती.

ट्विटरने हटवली ब्लू टिकवाली बोगस अकाऊंट्स; हजारो लोक करीत होते फॉलो
ट्वीटरवर आपल्या आवाजात पोस्ट करा ट्विट; बस्स तुम्हाला कराव्या लागतील या सोप्या गोष्टी
Follow us on

नवी दिल्ली : सोशल मीडियातील मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरने बोगस अकाऊंटविरोधात दंड थोपटले आहेत. अशा अकाऊंटवर कारवाईचा धडाका लावण्यात आला असून याच मोहिमेंतर्गत ट्विटरने ‘ब्लू टिक’वाली बोगस अकाऊंट्स हटवली आहेत. नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘पब्लिक व्हेरिफिकेशन प्रोग्राम’दरम्यान एकसारखे फॉलोअर्स असलेली काही बोगस अकाऊंट्स हटवली जात आहेत. एका डाटा वैज्ञानिकाने या कारवाईचा खुलासा केला आहे. पाहणीदरम्यान आढळले की, ‘ब्लू बॅज’वाल्या कोणत्याही व्हेरिफाईड अकाऊंटने एकही ट्विट पोस्ट केले नव्हते आणि दोन अकाऊंट्सने आपल्या प्रोफाईल फोटोंसाठी स्टॉक फोटोंचा उपयोग केला होता. (Twitter deletes bogus accounts with ‘Blue Tick’; Thousands of people were following)

डेली डॉटच्या वृत्तानुसार, ट्विटरने आता चुकून व्हेरीफाय केलेली काही बोगस अकाऊंट्स कायमची निलंबित केली आहेत. आम्ही चूकून काही बोगस अकाऊंट्सच्या व्हेरीफिकेशन अर्जांना मंजुरी दिली होती. आम्ही आता आपल्या प्लेटफॉर्मच्या स्पॅम पॉलिसीचे पालन करीत बोगस अकाऊंट्स कायमस्वरूपी निलंबित केली आहेत. तसेच संबंधित अकाऊंट्सचा व्हेरीफाईड बॅज हटवला आहे, असे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने एका निवेदनात म्हटले आहे.

बोगस अकाउंट्सची अशी पटवली ओळख

एका डेटा वैज्ञानिकने नवीन बनवण्यात आलेली 6 ट्विटर अकाऊंट्स व्हेरिफाय केली होती. यासंबंधी एका ट्विटमध्ये संबंधित अकाऊंट्सना टॅग केले गेले होते व त्यात आपण जरा ह्यांना भेटा, असे म्हटले होते. हे 16 जून 2021 रोजी तयार केलेल्या ब्लू-चेक व्हेरीफाय ट्विटर अकाऊंट्सचा एक समूह आहे. यावर कोणी अजूनपर्यंत ट्विट केलेले नाही आणि सर्वांचे जवळपास 1000 फॉलोअर्स आहेत. यातील बहुतांश फॉलोअर्स एकसारखेच आहेत. या सहा अकाऊंट्सपैकी दोन अकाऊंट्समध्ये लोकांचे फोटो त्यांच्या प्रोफाईल फोटोच्या रुपात आहेत. या सहा अकाऊंट्समध्ये 976 संशयित फॉलोअर्स आढळले आहेत. ही सर्व अकाऊंट्स 19 जून ते 20 जून यादरम्यान बनवण्यात आली होती. व्हेरिफेकेशनमधील चुकांमुळे ही बोगस अकाऊंट्स व्हेरीफाय केली गेली असू शकतात, असे फेसबुकचे माजी मुख्य सुरक्षा अधिकारी एलेक्स स्टामोस यांनी ट्विट केले आहे.

मे महिन्यात सुरू झाली व्हेरिफिकेशन प्रक्रिया

ट्विटरने मे महिन्यात आपली नवीन व्हेरिफिकेशन अर्ज प्रक्रिया नव्याने सुरू केली होती. या प्रक्रियेची सुरुवात सहा कॅटेगरीजच्या माध्यमातून झाली. तसेच ट्विटरवर युजर्सला ब्लू बॅज गोळा करण्यात मदत करण्यासाठी जागतिक पातळीवर ‘पब्लिक अ‍ॅप्लिकेशन्सची समिक्षा करण्यात आली. ट्विटरच्या या कारवाईच्या मोहिमेमुळे बोगस अकाऊंट्स बनवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. (Twitter deletes bogus accounts with ‘Blue Tick’; Thousands of people were following)

इतर बातम्या

बेरोजगारीवर सरकारचा अॅक्शन प्लॅन; उद्योगांना नव्या रोजगारांवर सवलत मिळणार; सर्व काही जाणून घ्या

महिलांचे सोने चोरुन पळ काढण्याचा प्रयत्न, कर्नाटकच्या भामट्याला ग्रामस्थांनी दिला चोप