महिलांचे सोने चोरुन पळ काढण्याचा प्रयत्न, कर्नाटकच्या भामट्याला ग्रामस्थांनी दिला चोप

महिलांचे सोने चोरुन पळ काढण्याचा प्रयत्न, कर्नाटकच्या भामट्याला ग्रामस्थांनी दिला चोप
SANGLI THIEF VIRAL VIDEO

सांगलीच्या मिरज तालुक्यातील एरंडोली-गुंडेवाडी रस्त्यावर महिलांचे सोने चोरून पळ काढणाऱ्या चोरट्याला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jul 13, 2021 | 9:56 PM

सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील एरंडोली-गुंडेवाडी रस्त्यावर महिलांचे सोने चोरून पळ काढणाऱ्या चोरट्याला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याच रस्त्यावर चोरट्यांनी यापूर्वी अनेक चोऱ्या केल्या आहेत. त्यामुळे महिला आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आकाश मारुती हाराळे उर्फ कांबळे असे चोप दिलेल्या चोरट्याचे नाव आहे. तो कर्नाटक राज्यातील रहिवासी आहे. (Sangli thief beaten by people who try to flee after stealing women gold)

झडती घेताच ग्रामस्थांना सापडले सोने, नंतर दिला चोप

मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात एरंडोली-गुंडेवाडी या रस्त्यावर यापूर्वी अनेकदा चोरीचे प्रकार घडले आहेत. या चोऱ्यांमुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, यावेळी आरोपी आकाश हाराळे हा ग्रामस्थांच्या हाती लागला. ग्रामस्थांनी आरोपी आकाशची थोडी चौकशी केली. त्यानंतर ग्रामस्थांनी या चोराची झडती घेण्याचे ठरवले. परिणामी लोकांना आरोपी आकाशच्या खिशात सोने सापडले. त्यानंतर आरोपी आकाश चोर असल्याचे समजताच ग्रामस्थांनी त्याला चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आरोपी कर्नाटकमधील अथणी तालुक्यातील रहिवासी

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आकाश मारुती हाराळे उर्फ कांबळे कर्नाटकमधील अथणी तालुक्यातील मोळे या गावातील रहिवासी आहे. या आरोपीला मारहाणीचा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला. या आरोपीला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या जवळचे 60 हजार रुपयांचे सोने जप्त केले असून त्याची पुढील चौकशी सुरु आहे.

इतर बातम्या :

दुर्मीळ प्रजातीच्या मगरीच्या पिलांची तस्करी करणाऱ्याला बेड्या, ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई

अमेझॉनवरुन स्पाय कॅमेरा मागवला, महिला डॉक्टरच्या बाथरुममध्ये बसवला, पुण्यातील MD जगतापला कोठडी

डॉक्टरच्या ड्रग्ज बेकरीचा पर्दाफाश, केकमधून ड्रग्जचा पुरवठा, समीर वानखेडेंची धडाकेबाज कारवाई

(Sangli thief beaten by people who try to flee after stealing women gold)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें