AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुर्मीळ प्रजातीच्या मगरीच्या पिलांची तस्करी करणाऱ्याला बेड्या, ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई

आरोपीच्या ताब्यातून क्रोकोडियस पॅलेस्ट्रीयस या दुर्मिळ प्रजातीचे मगरीच्या 7 पिलांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दुर्मीळ प्रजातीच्या मगरीच्या पिलांची तस्करी करणाऱ्याला बेड्या, ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई
ठाण्यात मगरीच्या पिलांची तस्करी, आरोपीला अटक
| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 13, 2021 | 7:07 PM
Share

ठाणे : मगरीच्या पिलांची तस्करी करणाऱ्या आरोपीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुंब्रा इथून अटक केली आहे. सकलेन सिराजुद्दीन खातीब असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तो मुंब्रा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीच्या ताब्यातून क्रोकोडियस पॅलेस्ट्रीयस या दुर्मीळ प्रजातीचे मगरीच्या 7 पिलांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. (smuggling of rare species of crocodiles, Accused arrested)

मगरीच्या पिलांची विक्री करण्यासाठी एकजण मुंब्रा इथं येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी 10 जुलै रोजी रात्री 11.35 वाजता मुंब्रा बायपास इथं रेतीबंदर पुलाखाली सापळा लावला. त्यावेळी एक व्यक्ती प्लॅस्टिक बॅग घेऊन संशयास्पदरित्या फिरताना आढलून आला. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेत त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळील प्लॅस्टिक बॅगेत मगरीची तब्बल 7 जिवंत पिल्लं आढळून आली.

मगरीच्या पिलांची किंमत प्रत्येकी 40 हजार

मगरीच्या पिलांना ठेवण्यासाठी तस्कराने एक खास पिंजरा असलेली प्लॅस्टिक बॅग बनवली होती. ही सर्व पिल्लं क्रोकोडियस पॅलेस्ट्रीयस या दुर्मीळ जातीची असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी पिल्लांची सुटका करत त्यांना वन विभागातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं. अटक करण्यात आलेल्या आरोपीने ही पिल्लं प्रत्येकी 40 हजार रुपये दराने विक्रीसाठी आणली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीला 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

या दुर्मीळ प्रजातीच्या मगरीच्या पिल्लांची एकूण किंमत 2 लाख 80 हजार रुपये इतकी आहे. अटक केलेल्या आरोपीस न्यायालयात हजर केलं असता, त्याला 15 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीने मगरीची ही पिल्लं कुठून आणली? तसंच या पिलांची विक्री तो कुणाला करणार होता? याचा तपास ठाणे पोलिसांचं खंडणी विरोधी पथक करत आहे.

इतर बातम्या :

घरावर पेट्रोल टाकून कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, उल्हासनगर हादरलं

रेल्वे स्टेशनवर हत्या करुन ‘तो’ गर्दीत मिसळला, पोलिसांनी दहा दिवसात मुसक्या आवळल्या, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

smuggling of rare species of crocodiles, Accused arrested

Follow Us
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा