AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिरात देणगी मोजणीदार म्हणून करायची नोकरी? किती हवे शिक्षण, अर्ज करणार कसा? निवड प्रक्रिया जाणून घ्या

Ram Mandir Counting Staff Job: अयोध्येतील राम मंदिरातील देणगी मोजण्याचे काम करणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. याठिकाणी नोकरी करण्याची इच्छा असेल तर कसा करावे लागेल अर्ज? काय हवे शिक्षण?

राम मंदिरात देणगी मोजणीदार म्हणून करायची नोकरी? किती हवे शिक्षण, अर्ज करणार कसा? निवड प्रक्रिया जाणून घ्या
राम मंदिरात देणगी मोजणीदार म्हणून करायची नोकरी?
| Updated on: Jul 12, 2026 | 4:57 PM
Share

Ram Mandir Counting Staff Job: अयोध्येतील राम मंदिरात देणगी घोटाळ्याने, देणगी चोरीने राम भक्तांना मोठा धक्का बसला आहे. येथे भक्तांची संख्याच नाही तर देणगीचा ओघही रोडवला आहे. काल देणगीची मोजदात करणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांनी एकदाच राजीनामे दिले. याठिकाणी देणगी मोजणी करणारा कर्मचारी म्हणून नोकरी करण्याचे काम करायचे असेल तर कसा करावा लागेल अर्ज? किती हवे शिक्षण? कशी आहे निवड प्रक्रिया? जाणून घ्या.

राम मंदिरात भाविक भक्त श्रद्धेनुसार देणगी देतात. ते मोजण्याचे काम जोखमीचे आणि जबाबदारीचे असते. या ठिकाणी काम करण्याचे नियम आहेत. त्यानुसार रक्कम मोजावी लागते. त्याची बंडलं तयार करावी लागतात. त्याचा रेकॉर्ड ठेवावा लागतो. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. सुरक्षा आणि पैशांचा विषय असल्याने सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्यातच हे काम पूर्ण करावे लागते. हे काम करताना अनेक सुरक्षा वर्तुळ पूर्ण करावी लागता.

श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट प्रत्येकवेळी काऊंटिंग कर्मचाऱ्यांसाठी भरती प्रक्रिया राबवत नाही. गरजेनुसार, प्रशासन, अकाऊंटिंग, कार्यालय सहाय्यक, मदत कर्मचारी आणि इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. देणगीचा पैसा मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज भासल्यास केवळ ट्रस्टच्या अधिकृत भूमिकेवरच अवलंबून राहावे लागते.

कशी होते निवड?

तुम्ही अर्ज केल्यानंतर उमेदवारला विहित प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यामध्ये लेखी परीक्षा, मुलाखत आणि पूर्वानुभव असल्यास तो ग्राह्य धरण्यात येतो. अंतिम निवड होण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी केली जाते. पोलिसांकडून चारित्र्य पडताळणीही गरजेची असते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात येते. त्याला अगोदर कामाचे प्रशिक्षण देण्यात येते.

भरती प्रक्रिया कशी कळते?

श्रीराम मंदिराच्या व्यवस्थापनातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया श्री राम जन्मभूमि क्षेत्र ट्रस्टकडून राबवली जाते. ट्रस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर, साईटवर याविषयीची माहिती देण्यात येते. ट्रस्टच्या सोशल अकाऊंटवरही त्याची माहिती देण्यात येते. उमेदवारांनी कोणतेही आमिषं अथवा फसव्या आश्वासनांना बळी पडू नये असे ट्रस्टने अगोदरच आवाहन केलेले आहे.

कोण करू शकतो अर्ज?

पदानुसार योग्यता, शैक्षणिक आर्हता याची माहिती पदभरतीच्या जाहिरातीत देण्यात येते. मोजणीच्या आणि हिशोब तपासणीच्या कामासाठी वाणिज्य, कॉमर्स शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. या क्षेत्रातील उच्च शिक्षण असेल तर अशा उमेदवाराला संधी मिळू शकते. संगणकीय ज्ञान असणे आणि इतर कौशल्य असणे आवश्यक आहे. रेकॉर्ड व्यवस्थापनाचे ज्ञानही गरजेचे आहे.

Follow Us
मेळावा रद्द करा, नाहीतर मी येतोच! जरांगेंचा थेट इशारा...
tv9 Marathi Special Report | मेळावा रद्द करा, नाहीतर मी येतोच! जरांगेंचा थेट इशारा; शिंदेंच्या सभेत काळे झेंडे अन् घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
तिसरा श्रावणी सोमवार अन् त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीचा सागर!
Nashik | तिसरा श्रावणी सोमवार अन् त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीचा सागर! मध्यरात्रीपासून भाविकांची तुफान गर्दी
मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाला..
Shivsena | मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! मिशन टायगरमधून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू
जरांगेंनंतर हाकेंचा मुंबईकडे एल्गार! सरकारसमोर नवं आव्हान काय?
tv9 Marathi Special Report | जरांगेंनंतर हाकेंचा मुंबईकडे एल्गार! 1 सप्टेंबरला आझाद मैदानात ओबीसींचा महासंग्राम; सरकारसमोर नवं आव्हान काय?
जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस; सरकारकडून आज चर्चा, कोण कोण जाणार?
Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस; सरकारकडून आज मोठी चर्चा, कोण कोण जाणार?
श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले'-सदाभाऊ खोत
Sadabhau Khot : 'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले', मंत्रीपद न मिळाल्याने सदाभाऊ खोतांकडून खदखद व्यक्त
24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
प्रसंगावधान राखत बस कर्मचाऱ्याने वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण
केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये मेडलवरून वाद; पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव
ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ