

कृषी अर्थशास्त्री - यांचे काम म्हणजे सूक्ष्म आर्थिक आणि व्यापक आर्थिक संकल्पना लागू करून आर्थिक निर्णय समजणे. खरेदी करताना लोक काय निर्णय घेतात किंवा सरकार शेतकऱ्यांना कशी मदत करते यासारखे. ते यासाठी डेटा विश्लेषण करतात. शेती अर्थशास्त्रज्ञ शेतातल्या जमिनीच्या सर्वेक्षणात, शेतकऱ्यांशी संवाद साधून आणि संशोधन करण्यातही त्यांचा वेळ घालवतात. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अर्थशास्त्राची पदवी घेतली पाहिजे. तसेच गणिताच्या विषयावर चांगली पकड असावी.

माती आणि वनस्पती वैज्ञानिक - यांचे कार्य जमिनीच्या रचनेचा झाडाच्या वाढीवर कसा परिणाम होईल हे पाहणे हे आहे. ते सविस्तर अहवालात डेटा सादर करतात, ज्याद्वारे शेतकऱ्यांना आपल्या जागेचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल याबद्दल सल्ला दिला जातो. तसेच सर्वात योग्य पिकांची माहिती दिली जाते. मृदा व वनस्पती वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये संशोधन कार्य करतात. यासह ते शेतातून नमुनेही गोळा करतात.

शेती विक्रेते - हे शेतकर्यांना शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री तसेच पशू खाद्य, खते, बियाणे यासारख्या इतर वस्तूंची विक्री करतात. याशिवाय ते उत्पादनांबाबत शेतकऱ्यांना सल्ला देतात. शेतकर्यांच्या गरजा जाणून घेतल्यानंतर त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे ते सांगतात. यासाठी विक्री आणि विपणनाची पदवी आवश्यक आहे.

कमर्शियल हॉर्टिकल्चरिस्ट - यांचे काम संपूर्ण उत्पादन प्रक्रियेवर देखरेख ठेवणे आहे. वनस्पतींच्या कापणीपासून ते अंतिम वस्तूंचे पॅकेजिंग आणि वितरणपर्यंत समावेश आहे. त्यांचे काम हे पर्यवेक्षण करणे, कर्मचार्यांना प्रशिक्षण देणे, कीटक नियंत्रणाचे व्यवस्थापन करणे, नवीन उत्पादने विकसित करणे, विपणन करणे, दररोज खरेदीदार आणि विक्रेत्यांमधील करारावर बोलणी करण्यास मदत करणे हे आहे. व्यावसायिक फलोत्पादकांकडे व्यवस्थापनाची मजबूत कौशल्ये असणे आवश्यक आहे.