AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

maharashtra job recruitment 2023 : ‘या’ जाहिरातीवर तुम्ही लक्ष ठेवाच, काही अटीही शिथिल, 19 हजार 460 पदांसाठी निघणार मेगा भरती

मार्च 2019 मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट 'क' मधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु, त्या दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोनाची पार्श्वभूमी तसेच इतर विविध कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नव्हती.

maharashtra job recruitment 2023 : 'या' जाहिरातीवर तुम्ही लक्ष ठेवाच, काही अटीही शिथिल, 19 हजार 460 पदांसाठी निघणार मेगा भरती
MAHARASHTRA GOVERNMENTImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Aug 04, 2023 | 10:01 PM
Share

मुंबई । 4 ऑगस्ट 2023 : ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील 100 टक्के आणि इतर विभागाकडील 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबत राज्यसरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट ‘क’ मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरण्याबाबत हा निर्णय आहे. मार्च 2019 मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट ‘क’ मधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु, त्या दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोनाची पार्श्वभूमी तसेच इतर विविध कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नव्हती.

मात्र, त्यानंतर शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत ही रखडलेली मेगा भरती करण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट 2023 रोजी यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. इच्छुक तसेच पात्र उमेदवारानी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा असून त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन 25 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

जाहिरातींच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत, इतर आवश्यक अटी, शर्ती इत्यादी बाबी संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार आहे असे मंत्री महाजन यांनी सांगितले.

पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार आहे. यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अर्ज करावे. अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये असे आवाहनही मंत्री महाजन यांनी केले आहे.

भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास आणि परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

पारदर्शक परीक्षा प्रक्रिया

परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस (IBPS) कंपनीमार्फत करण्यात येत असून परीक्षेमध्ये अत्यंत पारदर्शकता राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने कोणत्याही आमिषास बळी पडू नये असेही ते म्हणाले.

वयाधिक्य झाले तरी परीक्षेस बसण्यास पात्र

ज्या उमेदवारांनी मार्च 2019 मधील जिल्हा परिषद जाहिरातीकरीता अर्ज केला होता मात्र आता वयाधिक्य झाल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होत आहेत अशा उमेदवारांना 31 डिसेंबर, 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे.

वयोमर्यादेत 2 वर्षे इतकी शिथिलता

ज्या उमेदवारांनी मार्च 2019 परीक्षेकरीता अर्ज केलेला नाही, त्यांनाही सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयास अनुसरुन कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आली आहे. तसेच 31 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?