करवाचौथचं व्रत केलं, उपासही सोडला… त्याच रात्री 12 वधूंचा पोबारा, असं काय घडलं ?

करवा चौथला सर्व तरुणींनी पाणीही न पिता उपवास केला.संध्याकाळी छान सजून पूजा केली, पक्वान्न तयार केली आणि कुटुंबियांसोबत सण साजरा केला. रात्री चंद्रदर्शन झाल्यावर उपासही सोडला. मात्र रात्री..

करवाचौथचं व्रत केलं, उपासही सोडला... त्याच रात्री 12 वधूंचा पोबारा, असं काय घडलं ?
| Updated on: Oct 13, 2025 | 12:28 PM

बिहारमधून अलीगडला आलेल्या 12 वधूंनी असं कांड केलंय तकी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. करवा चौथच्या दिवशीच या 12 जणी लाखो रुपये रोख घेऊन घरातून पळून गेल्या. हे समोर आल्यावर प्रचंड गदारोळ माजला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सर्व वधू आणि त्यांच्या टोळीतील सदस्यांचा शोध घेण्यासाठी अनेक पोलिस पथके बिहारला पाठवण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 9-10 ऑक्टोबर 2025 रोजी अलिगड शहर आणि इग्लास शहरात 12 लग्ने झाली. ही सर्व स्थळं बिहारमधून आणण्यात आली होती. हे लग्न अनेक मध्यस्थांमार्फत करण्यात आले होते, ज्यात इग्लास येथील रहिवासी मुकेश गुप्ता उर्फ ​​सचिन यांचा समावेश होता. दलालांनी प्रत्येक लग्नासाठी 1 ते 1.30 लाख रुपये कमिशन आकारले. महिला बिहारहून अलीगढला गेल्या आणि दलालाच्या घरी राहिल्या.

यातील बहुतांश कुटुंबं ही अलिगढ शहर (सासनी गेट परिसर) आणि इग्लास (कैलाश नगर, भाऊंरा गौरव) येथील होती. हे तरुण25 ते 35 या वयोगटातील होते आणि स्थानिक नोकऱ्या किंवा व्यवसाय करत होते. हे प्रकरण समोर आल्यावर खळबळ माजली आहे. पळून गेलेल्या वधूंची ही एक संघटित टोळी होती जी बिहारमधून मुलींना लग्नासाठी आणत असे माजी महापौर शकुंतला भारती म्हणाल्या. यापूर्वीही अलीगढ, आग्रा आणि मथुरा असे अनेक प्रकार घडले आहे, तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही बहुतेक लग्ने 9 ऑक्टोबर रोजी झाली, तर काही विवाह 10 ऑक्टोबर रोजी (करवा चौथ) कोर्ट मॅरेज स्वरूपात किंवा मंदिरात झाली. वधूंना त्यांच्या सासरच्यांनी महागडे दागिने (सोने आणि चांदी), साड्या आणि रोख रक्कम भेट म्हणून दिली. करवा चौथला सर्व तरुणींनी पाणीही न पिता उपवास केला.संध्याकाळी छान सजून पूजा केली, पक्वान्न तयार केली आणि कुटुंबियांसोबत सण साजरा केला. रात्री चंद्रदर्शन झाल्यावर उपासही सोडला.

अन्नात मिळवले गुंगीचे औषध

त्या वधूंनी चाळणीतू चंद्र आणि पतीचा चेहरा पाहिला , व्रत् संपन्न झालं. मात्र धक्क्कदायक गोष्ट म्हणजे त्यांनी संपूर्ण कुटुंबाच्या अन्न आणि पेयांमध्ये गुंगीचं औषध मिसळले, ज्यामुळे ते बेशुद्ध पडले. सकाळी कुटुंबांतील लोकांना जाग आली तेल्गा सर्व वधू गायब होत्या. त्या त्यांचे दागिने, रोख रक्कम आणि इतर सामान घेऊन पळून गेल्या होत्या. सर्व 12 तरुणी मध्यरात्रीच पळून गेल्या होत्या.

4 जणांनी दाखल केली तक्रार

आतापर्यंत चार कुटुंबांनी सासनी गेट आणि इग्लास पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केले आहेत. उर्वरित आठ कुटुंबे पोलिसांच्या संपर्कात आहेत आणि त्या कुटुंबांचे एफआयआर लवकरच दाखल केले जातील. मिळालेल्या माहितीनुसार, दलाल मुकेश गुप्ता हा बिहारचा आहे. तो बिहारहून मुलींना अलीगडला घेऊन आला होता. सध्या, वधूंचे मोबाईल नंबर, पत्ते आणि ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि पाळत ठेवणाऱ्या कक्षाचा वापर करून ट्रॅकिंग केले जात आहे. 13 ऑक्टोबर रोजी अलीगढ पोलिसांचे एक पथक बिहारला रवाना झाले. टोळीचे नेटवर्क उध्वस्त करण्यासाठी पोलिसांकडून कसून प्रयत्न सुरू आहेत

हा एक संघटित गुन्हा आहे. मध्यस्थ शोधणे ही प्राथमिकता असून आम्ही पीडितांना नक्की न्याय मिळवून देऊ असे सीओ फर्स्ट मयंक पाठक म्हणाले. दरम्यान, माजी महापौर शकुंतला भारती यांनी पीडितांची भेट घेतली आणि कडक पोलिस कारवाईची मागणी केली.

अलिगडमध्ये, गेल्या एका वर्षात जिल्ह्यातील विविध ठिकाणी वधू चोरीचे 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत, त्यापैकी बहुतेक प्रकरणे बिहार किंवा झारखंडशी संबंधित आहेत. या घटनेनंतर, पोलिस आता लग्नाआधी पडताळणी नीट करण्याचा आणि दलालांवर विश्वास ठेवू नका असा सल्ला देत आहेत. मुलीच्या कुटुंबाची पडताळणी झाली आहे याची खात्री करा असेही पोलिसांतर्फे सांगण्यात आले.