AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॅलो…इथे दुर्गंधी येतीये, एकाच घरात सापडले 191 मृतदेह; पती पत्नीच्या भयंकर कृत्यानं पोलीसही हादरले, अख्ख्या गावाला फुटला घाम

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एकाच घरामध्ये तब्बल 191 मृतदेह सापडले आहेत, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

हॅलो...इथे दुर्गंधी येतीये, एकाच घरात सापडले 191 मृतदेह; पती पत्नीच्या भयंकर कृत्यानं पोलीसही हादरले, अख्ख्या गावाला फुटला घाम
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 28, 2025 | 6:48 PM
Share

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एका फ्यूनरल होमचा मालक आणि त्याच्या पत्नीनं जे कृत्य केलं आहे, त्यामुळे पोलीसही हादरले आहेत. फ्यूनरल होममध्ये अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मृतदेहांना अग्नी न देताच हा व्यक्ती आणि त्याची पत्नी ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्या लोकांच्या कुटुंबाला नकली राख पाठवून द्यायचे. मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर आता या दोघा पती-पत्नीविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे, त्यांना न्यायालयानं वीस वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की हे प्रकरण अमेरिकेमधील कोलोराडो येथील आहे. कोलोराडोची राजधानी डेनवरपासून 160 किलोमीटर असलेल्या पेनरोज नावाच्या छोट्या शहरात ही घटना घडली आहे. इथे ‘रिटर्न टू नेचर फ्यूनरल होम’ नावाचं फ्यूनरल होम हॉलफर्ड नावाचा व्यक्ती आपल्या पत्नीसोबत मिळवून चावत होता.2019 ते 2023 या काळात त्याच्या या फ्यूनरल होममध्ये अनेक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आले, मात्र त्याने या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलाच नाही, त्याना तसेच तिथेच सडण्यासाठी सोडून दिलं, आणि त्यांच्या कुटुंबाला बनावट राख पाठवली.

असं समोर आलं प्रकरण

एक दिवस या परिसरातील एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून सांगितलं की या परिसरात प्रचंड दुर्गंधी येत आहे, फोन येताच पोलीस तपासासाठी तिथे पोहोचले, दुर्गंधी कुठून येत आहे, याचा शोध घेत असतानाच ते या फ्यूनरल होममध्ये जाऊन पोहचले, तिथे असलेल्या एका घराचा दरवाजा उघडताच पोलिसांना प्रचंड धक्का बसला, या ठिकाणी एक नाही दोन नाही तर तब्बल 191 मृतदेह आढळून आले, त्यातील अनेक मृतदेहांची अवस्था प्रचंड वाईट होती, त्यातील काही मृतदेह सडण्यास सुरुवात झाली होती, या खोलीमध्ये खाचाखच मृतदेह भरलेले होते, त्या खोलीत पाय ठेवण्यासही जागा नव्हती, अखेर पोलिसांनी या प्रकरणात या फ्यूनरल होमच्या मालकाला अटक केली.

त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्याला मृतदेहाची विंटबना केल्याप्रकरणी न्यायालयानं तब्बल 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे, त्यासोबतच 1,070,413 डॉलरचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे, त्याने मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मिळणाऱ्या पैशांचा वापर हा अलिशान जीवन जगण्यासाठी केला, आणि मृतदेह तसेच एका खोलीमध्ये टाकून ठेवले.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.