
1xBet सट्टेबाजी प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांची एकूण ११.१४ कोटी रुपयांची तात्पुरत्या रुपाने जब्त केली आहे. ही कारवाई मनी लॉड्रींग प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ अंतर्गत करण्यात आलेली आहे. जप्त केलेल्या संपत्तीत सुरेश रैनाच्या नावावर ६.६४ कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि शिखर धवन याच्या नावावरील ४.५ कोटी रुपयांच्या एका स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.
1xBet सट्टेबाजी प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. ईडीने अनेक राज्यात दाखल एफआयआरच्या अंतर्गत तपास सुरु केला आहे. ऑनलाईन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म 1xBet अंतर्गत हा तपास सुरु आहे.तपासात आढळले की 1xBet आणि त्याचे सुरोगेट ब्रँड 1xBat, 1xBat Sporting Lines भारतात परवानगी शिवाय ऑनलाईल सट्टेबाजी आणि जुगाराची जाहीरात करत होते.
ईडीच्या मते रैना आणि धवन याने परदेशी कंपन्याच्या सोबत मिळून या प्लॅटफॉर्म्सची प्रसिद्धी केले आणि याच्या बदल्यात त्यांनी परदेशी मार्गाने पेमेंट दिले गेले. हे पैसे बेकायदेशीररित्या सट्टेबाजीतून कमावले गेले होते. ज्यांची खरी ओळख लपवण्यासाठी जटील लेनदेण केले गेले.
1xBet कंपनी भारतात हजारो खोट्या बँक खात्यांद्वारे पैशांची देवाणघेवाण करत होती.
आता पर्यंत ६ हजाराहून अधिक खोटी खाती आढळली आहेत. या खात्यांद्वारे सट्टेबाजीच्या रकमेला विविध पेमेंट गेटवेतून पाठवून खरा स्रोत लपवण्यात आला.
तपासात अनेक पेमेंट गेटवे विना केवायसी व्हेरिफिकेशिवाय व्यापारी ( मर्चंट )जोडत होते.
मनी लॉन्ड्रींगचा एकूण ट्रेल १००० कोटीहून अधिक आहे.
ईडीने या केसमध्ये चार पेमेंट गेटवेवर छापेमारी केली आहे. ६० हून अधिक बँक खात्यांना फ्रीज केले आहे. आतापर्यंत चार कोटीहून अधिक रक्कम गोठवली आहे.ईडीने सर्वसामान्य लोकांना सूचित केले आहे की कोणत्याही ऑनलाईन सट्टेबाजी वा सट्टेबाजीच्या जाहिराती तसेच गुंतवणूकीपासून दूर राहावे. बेकायदेशीर सट्टेबाजी आणि जुगार केवळ आर्थिक नुकसानच पोहचवत नाही तर मनी लॉड्रींग आणि अन्य बेकायदेशीर कारवायांना प्रोत्साहन देत आहे. कोणत्याही संशयित ऑनलाईल जाहिरात आणि ट्राक्झंशनची माहिती जनतेने स्थानिक पोलिस किंवा ईडीला द्यावी असे आवाहन ईडीने केले आहे.