AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीसाठी ऑनलाईन मिठाई ऑर्डर केली, बिल ऐकून तुम्हीही थक्क व्हाल !

नोएडातील सेक्टर 27 मधील रहिवासी असलेले नवीन यांना मिठाई खरेदी करायची होती. मात्र यासाठी मिठाई दुकानात रांगेत उभ्या राहण्याऐवजी त्यांनी ऑनलाईन मिठाई खरेदी करायचे ठरवले.

दिवाळीसाठी ऑनलाईन मिठाई ऑर्डर केली, बिल ऐकून तुम्हीही थक्क व्हाल !
मिठाई खरेदी नावाखाली इसमाची अडीच लाखाची फसवणूकImage Credit source: सोशल मीडिया
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Oct 17, 2022 | 9:21 PM
Share

नोएडा : दिवाळी सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे सर्व नागरिक मोठ्या प्रमाणावर दिवाळीची खरेदी करत आहेत. काही लोक बाजारातील गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात. यामुळे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. असाच एक ऑनलाईन फसवणुकीचा (Online Fraud) प्रकार नोएडात उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने ऑनलाईन मिठाई खरेदी (Purchase Online Sweets) केली. मिठाईचे बिल त्याने ऑनलाईन भरले. मात्र मिठाईच्या बिलाच्या नावाखाली त्या व्यक्तीला 2.77 लाखाला गंडा (2.77 Lakh Fraud) घातल्याचे उघडकीस आले आहे.

व्यक्तीने ऑनलाईन खरेदी केली मिठाई

नोएडातील सेक्टर 27 मधील रहिवासी असलेले नवीन यांना मिठाई खरेदी करायची होती. मात्र यासाठी मिठाई दुकानात रांगेत उभ्या राहण्याऐवजी त्यांनी ऑनलाईन मिठाई खरेदी करायचे ठरवले. मात्र ऑनलाईन मिठाई खरेदी त्याला चांगलेच महागात पडले आहे.

इंटरनेटवर सर्च करुन मिळवला दुकानाचा नंबर

मिठाई ऑर्डर करण्यासाठी त्याने इंटरनेटवर मिठाईची दुकाने सर्च केली. नेटवर सर्च केले असता त्यांना चांदणी चौकातील एका मिठाईच्या दुकानाचा नंबर मिळाला. नवीनने दुकानात फोन करुन मिठाईची ऑर्डर दिली.

मिठाईची ऑर्डर दिल्यानंतर दुकानदाराने मिठाईचे पैसे नवीनला ऑनलाईन देण्यास सांगितले. मिठाईचे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी दुकानदाने नवीनकडे डिटेल मागितली.

मिठाईच्या नावाखाली 2.77 लाखांचा चुना

नवीनने डिटेल दिल्यानंतर त्याच्या खात्यातून 2.77 लाख रुपयाचे ट्रान्झेक्शन झाले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे नवीनच्या लक्षात आले. नवीनने तात्काळ पोलीस ठाणे गाठत फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली. नवीनच्या तक्रारीवरुन नोएडा पोलीस प्रकरणाचा तपास करत आरोपीचा शोध घेत आहेत.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान