AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 वर्षाचा दीर आणि 38 वर्षांची वहिनी, दोघांचं सूत जमलं पण प्रेम कहानीचा भयानक अंत

वहिनी आणि दीराच्या प्रेमाचा भयानक अंत झाला आहे. दोघांच्या प्रेमप्रकरणाचा इतका वाईट अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आला आहे.

20 वर्षाचा दीर आणि 38 वर्षांची वहिनी, दोघांचं सूत जमलं पण प्रेम कहानीचा भयानक अंत
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 16, 2023 | 11:15 PM
Share

जयपूर : अनेकांचे लग्न झाल्यानंतरही विवाहबाह्य संबंध असल्याचं पाहायला मिळतं. पती आणि पत्नी दोघांनी सात जन्माची साथ देण्याची शपथ घेतलेली असते. मात्र विवाहबाह्य संबंधातून गुन्हागारीच्या घटनाही समोर येतात. मात्र जेव्हा विवाहबाह्य संबंध जेव्हा समोर येतात तेव्हा अनेक संसार मोडलेले आपण पाहिले आहेत. अशातच राजस्थानमधील श्रीगंगानगरच्या सुरतमध्ये वहिनी आणि दीराच्या प्रेमाचा भयानक अंत झाला आहे. दोघांच्या प्रेमप्रकरणाचा इतका वाईट अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

सुरतगड परिसरात 20 वर्षांच्या दीराचं आणि 38 वर्षीय वहिनीचं सुत जुळतं. दोघांच्या प्रेमप्रकरणांबद्दल घरात माहिती होते, घरात यावरून जोरदार भांडण सुरू होतं. दोघेही इतके वैतागून जातात आणि टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतात. शनिवारी दोघे बाईकवरून निघून जातात आणि सूरतगड-हनुमानगड रेल्वे ट्रॅकसमोर उडी मारत आपलं जीवन संपवतात.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतात. दोघांचेही मृतदेह सुरतगडच्या शासकीय रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आले होते. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी रंगमहालचे सरपंच विजयसिंह टाकर, माजी सरपंच आस्करन जलप यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, मृतांमधील 20 वर्षीय दीराचं नाव पृथ्वीराज मेघवाल आणि वहिनी सुनीता मनसाराम मेघवाल अशी मृतांची नावं आहेत. दोघांनीही आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याने गावकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?