Rohit Arya Encounter : बाथरुममधून घुसले 8 कमांडो, समोर 17 मुलं…35 मिनिटांचा थरार, स्टुडिओच्या आत काय घडलं, Inside Story

Rohit Arya Encounter : मुंबईत काल एक हादरवून सोडणारी घटना घडली. रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने आरए स्टुडिओमध्ये शूटिंगसाठी बोलवलेल्या लहान मुलांना बंधक बनवलेलं. या मुलांच्या सुटकेसाठी मुंबई पोलिसांनी त्यांच्या QRT कमांडोजचा वापर केला. वाचा या ऑपरेशनची इनसाइड स्टोरी.

Rohit Arya Encounter : बाथरुममधून घुसले 8 कमांडो, समोर 17 मुलं...35 मिनिटांचा थरार, स्टुडिओच्या आत काय घडलं, Inside Story
Rohit Arya Encounter
| Updated on: Oct 31, 2025 | 11:24 AM

मुंबईत गुरुवारी दुपारी अत्यंत धक्कादायक घटना घडली. रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने पवईच्या आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांना बंधक बनवून ठेवलं होतं. पोलीस रोहित आर्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मुलांचा जीव धोक्यामध्ये होता. अखेर मुंबई पोलिसांना मुलांच्या सुटकेसाठी स्पेशल ऑपरेशन करावं लागलं. या ऑपरेशनमध्ये मुंबई पोलिसांनी त्यांच्या क्विक रिसपॉन्स टीम कमांडो युनिटचा वापर केला. क्विक रिसपॉन्स टीमच्या कमांडो युनिटने 35 मिनिटांच्या ऑपरेशनमध्ये एकूण 19 जणांची सुटका केली. एकूण 17 लहान मुलांना रोहित आर्याने बंधक बनवलेलं. एक वृद्ध व्यक्ती सुद्धा त्यामध्ये होता. 17 पैकी 7 मुलांची सुटका करण्याचं कसब थक्क करुन सोडणारं होतं. हे स्पेशल ऑपरेशन कसं केलं? जाणून घ्या त्याच्या डिटेल्स.

इंडिया टुडेच्या एक रिपोर्टनुसार, मुंबई पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी बचाव अभियान सुरु करण्यापूर्वी जवळपास दोन तास आरोपी रोहित आर्याशी बोलत होते. पोलिसांनी आर्याला शब्द दिलेला की, तू मुलांना सोडलस तर तुझ्या मागण्या मान्य करु. पण आरोपी वारंवार हेच बोलत होता की, त्याच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तो मुलांना जिवंत जाळेल. अधिकाऱ्यांना लक्षात आलं की, रोहित आर्या रागात आहे, काहीही झालं तरी तो बंधकांना सोडणार नाही, त्यावेळी कमांडो ऑपरेशनचा निर्णय घेण्यात आला.

रोहित आर्या काय धमकी देत होता?

रिपोर्टनुसार, हे बचाव ऑपरेश अवघ्या 35 मिनिटात संपलं. QRT च्या आठ कमांडोजची टीम एका छोट्याशा प्रवेशद्वारातून बाथरुममध्ये घुसली. तिथून ते ऑडिशन रुममध्ये गेले. त्या खोलीत बंधक होते. मुख्य कमांडोंनी रक्तपात टाळण्यासाठी रोहित आर्याशी बोलण्याचा शेवटचा प्रयत्न केला. पण रोहित आर्या त्याच्याजवळ असलेली गन, केमिकल आणि एका लायटरद्वारे वारंवार हीच धमकी देत होता की, पोलीस आत आले, तर गोळीबार करीन. खोलीला आग लावेन.

एअर गनमधून गोळी चालवली

चर्चा फिस्कटल्यानंतर आर्याने एअर गनमधून गोळी चालवली. कमांडोजनी लगेच प्रत्युत्तराची कारवाई केली. मुख्य कमांडोने अपहरणकर्त्या रोहितवर गोळी झाडली. त्यात तो जखमी झाला. लगेच कमांडोजनी त्याला ताब्यात घेतलं. नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

स्टुडिओच्या आत काय अवस्था होती?

मिडिया रिपोर्ट्सनुसार, स्टुडिओच्या आतमध्ये खूप वाईट अवस्था होती. घाबरुन मुलं एक कोपऱ्यात बसलेली. स्टुडिओमध्ये उपकरणं विखुरलेली होती. कमांडोज त्या सगळ्या स्थितीत मुलांना वाचवण्याचा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. फॉरेंसिक टीमने नंतर घटनास्थळावरुन एअर गन, रसायन आणि लायटर जप्त केले. तपासासाठी हे साहित्य फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवलय. रिपोर्टनुसार, ज्या मुलांना वाचवलं, त्यातल्या बहुतांश मुलांच वय 5 वर्षाच्या आसपास आहे. त्यांना एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी बोलवण्यात आलेलं. कमांडो Action दरम्यान या मुलांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आलं. मेडिकल तपासणीनंतर त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आलं.