AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरण, लहान मुलांना जिथे ओलीस ठेवलं, त्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया

Rohit Arya : मुंबईत काल एक खळबळजनक घटना घडली. शूटिंगच्या निमित्ताने मुलांना बोलवून मुलांना ओलीस ठेवण्याचा प्रकार घडला. यावेळी मुलांना वाचवण्यासाठी पोलिसांना स्पेशल ऑपरेशन करावं लागलं. आता जिथे हे सर्व घडलं, त्या स्टुडिओची प्रतिक्रिया आली आहे.

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरण, लहान मुलांना जिथे ओलीस ठेवलं, त्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया
Rohit Arya
| Updated on: Oct 31, 2025 | 11:30 AM
Share

मुंबईच्या पवई परिसरात गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलांना शूटिंगसाठी बोलवून त्यांना बंधक बनवून ठेवण्याचा प्रकार घडला. पवईच्या आरए स्टुडिओमध्ये ही घटना घडली. रोहित आर्या नावाचा व्यक्ती या सगळ्यासाठी जबाबदार आहे. मुंबई पोलिसांनी ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका केली. हे बचाव ऑपरेशन सुरु असताना पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्याचा मृत्यू झाला. या घटनेने मुंबईत पालक वर्गाला हादरवून सोडलय. त्यांच्यामध्ये चिंतेचे वातवरण आहे.

आता हा सर्व प्रकार ज्या RA स्टुडिओमध्ये घडला. त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “काल आमच्या स्टुडिओमध्ये अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडली. अन्य व्यक्तीने केलेल्या बुकिंगदरम्यान हा प्रकार घडलेला आहे. पण मुंबई पोलिसानी तत्काळ केलेल्या कारवाईमुळे मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मुंबई पोलिसांचे आभार.आमची टीम पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत असून योग्य ती मदत करत आहे. आम्ही यापुढेही कलाकारांना योग्य ते सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहोत” असं आरए स्टुडिओने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

पोलिसांना यश आलं नाही

रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वी सर्व मुलांच्या पालकांना एक मेसेज पाठवला होता. त्यात त्याने म्हटलं होतं की, आज शूटिंगला वेळ लागणार आहे, त्यामुळे मुलांना दहा मिनिटात भेटून घ्या. त्यानंतर आर्याने हॉलचे दरवाजे बंद करून मुलांना ओलीस ठेवलं आणि काही वेळातच स्वतःचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. पोलीस तब्बल दीड ते पावणेदोन तास त्याच्याशी बोलत होते. त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र यामध्ये काही पोलिसांना यश आलं नाही.

पोलिसांनी हे ऑपरेशन कसं केलं?

तो ऐकत नाही, हे लक्षात आल्यावर पोलिसांनी आर्याला फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवलं. दुसऱ्या बाजुने शिडीचा वापर करून टॉयलेटच्या खिडकीतून स्टुडिओमध्ये प्रवेश केला. पवई पोलीस ठाण्याचे एटीसी सेलचे एपीआय अमोल वाघमारे साध्या वेषात खिडकीतून आत गेले. वाघमारे यांना बघताच रोहित आर्या हा बॅगमधून शस्त्र काढण्याच्या तयारीत होता, त्याचवेळी त्यांनी रोहित आर्यावर गोळी झाडली, या घटनेत त्याचा मृत्यू झाला.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.