AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alcohol Drinking : रविवारी रात्री दारु प्यायले, बुधवारी सकाळी दारु प्यायलेल्या सातही जणांचा मृत्यू! खळबळजनक घटना

मृत्यू झालेल्या सात जणांच्या बाबतीत अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Alcohol Drinking : रविवारी रात्री दारु प्यायले, बुधवारी सकाळी दारु प्यायलेल्या सातही जणांचा मृत्यू! खळबळजनक घटना
Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jul 21, 2022 | 6:50 AM
Share

दारु पिऊन (liquor Drinking) जात जणांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालच्या हावडामध्ये (Howrah, West Bangal) हा प्रकार घडला आहे. रविवारी रात्री दारु प्यायलेल्यांपैकी सात जणांनी बुधवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे सातही जणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, विषारी दारु प्यायलाने (Poisonous Alcohol ) मृत्यू झाला की त्यांनी बेकायदेशीर दारुचं सेवन केलं होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेनंतर स्थानिकांनी तीव्र संतापही व्यक्त केलाय. दारुचं दुकान चालवणाऱ्याला पोलिसांनी सात जणांच्या मृत्यूनंतर अटक केली आहे. त्याला पोलिसांच्या हवाले करण्यासाठी स्थानिक बेदम चोप दिलाय. आता या दारु विक्रेत्याची चौकशी केली जातेय. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दारु पिणाऱ्यांनी या घटनेची धास्ती घेतली असून आता पुढील तपास केला जातो आहे. पोलिसांनी त्यासाठी दारुचे नमुनेही फॉरेन्सिक चाचणीसाठी पुढे प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

अनैसर्गिक मृत्यू

मृत्यू झालेल्या सात जणांच्या बाबतीत अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरुवातीच्या पोस्ट मॉर्टेम रुपोर्टमध्ये दारुमुळे विषबाधा होऊन मृत्यू झाला असल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दारुवरच संशय

दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाने मात्र दारुवर संशय व्यक्त केला आहे. दारुमध्ये जीवघेणी रसायनं असू शकतात आणि त्याच्या सेवनामुळे तब्बेत बिघडून सात जणांचा मृत्यू झालेला असू शको, अशी शंका घेतली आहे. त्यामुळे पुढील तपासणीसाठी अधिकाऱ्यांनी दारुचे बुधवारी नमुने गोळा केलेत. फॉरेन्सिक टीमकडून आता या नमुन्यांचीच चाणी केली जाईल. आता या चाचणीतून नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

रविवारी रात्री सात जणांना दारूचं सेवन केलं होतं. ज्या ठिकाणाहून या सातही जणांनी दारु घेतली होती, त्या दुकानाचीही स्थानिकांनी बुधवारी तोडफोड केली. रविवारी दारु प्यायलेल्या सात जणांवर तीन दिवस उपचार सुरु होते. पण बुधवारी सकाळी त्यांच्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. पश्चिम बंगालच्या हावडा येथील घुसुरी येथे ही खळबळजनक घटना घडली.

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!