तोंडोळी दरोड्यानं औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचे धाबे दणाणले, वाचा वर्षात किती चोऱ्या, किती घरफोड्या?

| Updated on: Oct 21, 2021 | 4:20 PM

गंगापूरनंतर सिल्लेगाव, चिकलठाणा, खुलताबाद आणि वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक घटना घडल्या आहेत. या हद्दीत लोकसंख्या जास्त असल्यामुळे चोरीच्या घटनांचे प्रमाण जास्त असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

तोंडोळी दरोड्यानं औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचे धाबे दणाणले, वाचा वर्षात किती चोऱ्या, किती घरफोड्या?
तोंडोळी येथील घटनास्थळाची पोलिसांकडून पाहणी.
Follow us on

औरंगाबादः तोंडोळी दरोड्याच्या घटनेनंतर (Tondoli Robbery) औरंगाबादमधील ग्रामीण भागातील (Auranagabad rural area) वाढलेल्या चोऱ्या आणि दरोड्यांच्या प्रमाणावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर या कालावधीत तब्बल 961 चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी 446 घटना उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलिसांना यश आहे. तर चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी 37 टक्के मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंतच्या रेकॉर्डनुसार-

– औरंगाबाद ग्रामीण हद्दीत मागील नऊ महिन्यांत 6 दरोडे पडले.
– 34 ठिकाणी जबरी चोऱ्या झाल्या.
– 106 घरफोडीच्या घटना घडल्या.
– यातील दरोड्यातील सर्व गुन्हे उघडकीस आले असून 25 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
– याशिवाय ग्रामीण भागात जनावर चोरी, दुचाकी-चारचाकी वाहन, वाळू चोरी, मंदिरातील चोरी, मोबाइल चोरी, तार, खिसेकापू, शेतीची अवजारे चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
– 9 महिन्यांमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात 931 चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
– त्यातील 446 घटनांचा पोलिसांनी तपास पूर्ण केला आहे.
– यातील गुन्हे उघड करण्याचे प्रमाण 46 टक्के एवढे आहे. तर 37 टक्के मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

गंगापूरमध्ये सर्वाधिक चोऱ्या

औरंगाबाद ग्रामीण पोलीस हद्दीत गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक चोरीच्या घटना उघडकीस आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. गंगापूरनंतर सिल्लेगाव, चिकलठाणा, खुलताबाद आणि वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक घटना घडल्या आहेत. या हद्दीत लोकसंख्या जास्त असल्यामुळे चोरीच्या घटनांचे प्रमाण जास्त असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

20 दिवसात 100 पेक्षा जास्त गुन्ह्यांचा छडा

औरंगाबाद ग्रामीण पोलीस विभागाने मागील 20 दिवसात तब्बल 100 पेक्षा अधिक गुन्हे उघड करून मुद्देमालासह आरोपींना अटक केली आहे. तसेच ग्रामीण पोलिसांच्या तपासाचा वेग पुढील काळातही असाच राहील, असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे.

इतर बातम्या-

पुरुषांना बांधून ठेवले अन् चौघांची वासना जागृत झाली, तोंडोळी दरोड्याची आपबिती, औरंगाबाद पोलिसांसमोर नवे आव्हान!

औरंगाबाद खंडपीठाच्या अतिरिक्त बिल्डिंगचा उद्घाटनापूर्वीच वाद, वकील संघाची नाराजी, बहिष्काराचे संकेत