Nashik| बोरीपाडा आश्रमशाळेत 9 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; अभ्यास बुडू नये म्हणून वसतिगृहात ठेवले अन्…

| Updated on: Dec 13, 2021 | 11:00 AM

हर्सूल जवळच्या बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेत 9 वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आदिवासी विकास विभागाची ही राज्यात स्थापन झालेली पहिली आश्रम शाळा आहे.

Nashik| बोरीपाडा आश्रमशाळेत 9 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; अभ्यास बुडू नये म्हणून वसतिगृहात ठेवले अन्...
मृत रोहिणी वड.
Follow us on

नाशिकः हर्सूल जवळच्या बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेत 9 वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रोहिणी बापू वड (वय 15, रा. खडकओहोळ) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. विशेष म्हणजे आदिवासी विकास विभागाची ही राज्यात स्थापन झालेली पहिली आश्रम शाळा आहे.

जेवायलाही गेली नाही

रोहिणीने रविवारी दुपारी आत्महत्या केली. खरे तर या दिवशी शाळेला सुट्टी होती. तिच्या सर्व मैत्रिणी आणि इतर विद्यार्थिनी जेवणासाठी निघाल्या होत्या. मात्र, रोहिणी त्यांच्यासोबत गेली नाही. तिने मैत्रिणीला आपल्यासाठी डबा घेऊन ये, असा निरोप दिला. त्यानंतर पंख्याला ओढणी लावून गळफास घेतला. तिच्या मैत्रिणी जेवण करून आणि तिच्यासाठी डबा घेऊन आल्या. तेव्हा रोहिणीने दरवाजा उघडला नाही.

दरवाजा तोडला

रोहिणीच्या मैत्रिणी तिच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आल्या. तिने तिच्या खोलीवर थाप मारली. मात्र, तिने दरवाजा उघडला नाही. आतून कडी लावलेली होती. विद्यार्थिनींनी बराच वेळ प्रयत्न केला. मात्र, उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी वसतिगृहाच्या अधीक्षकांकडे धाव घेतली. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा रोहिणीने गळफास घेतल्याचे उघड झाले. पोलीस पाटील व पोलीस उपनिरीक्षकांनी पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

अभ्यासात हुशार

रोहिणी अभ्यासात हुशार होती. मात्र, तिचे खडकओहोळ हे गाव बोरीपाडा आश्रमशाळेपासून आठ किलोमीटर दूर होते. त्यात शाळा सुरू झाल्या आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संपही. त्यामुळे रोहिणीची शाळा बुडत होती. तिचे आई-वडील शेतमजूर आहेत. लेकीला रोज शाळेत सोडण्यासाठी त्यांच्याकडे वाहन नव्हते. त्यामुळे तिचा अभ्यास बुडू म्हणून त्यांनी तिला या आश्रमशाळेच्या वसतिगृहात ठेवले होते. मात्र, तिने आत्महत्या केली.

नेमके कारण काय?

रोहिणी अभ्यासात हुशार होती. तिच्या शिक्षकांनाही तिच्या प्रगतीचे कौतुक होते. तिला अभ्यासाचे कसलेही टेन्शन नव्हते. मग तिच्या आत्महत्येचे नेमके कारण काय होते, ते अजून समजलेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास हर्सूल पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश वारूळे यांच्या मार्गदर्शनासाखील हवालदार बाळू राऊत, एकनाथ पगार, सुनील तुंगार हे करत आहेत.

इतर बातम्याः

Nitin Gadkari| वेगळ्या विदर्भासाठी केंद्रीय मंत्री गडकरींना काळं फासण्याचा डाव; भाजप आमदार कुणावारांसोबतची क्लीप व्हायरल

मार्कांच्या घटत्या आलेखाचे टेंशन, मनात न्यूनगंड, औरंगाबादमध्ये तिने घेतला गळफास, गावात हळहळ!

एस.टी. कर्मचाऱ्यांना दिलेलं अल्टीमेटम, आज संपतंय, काय कारवाई होणार, आतापर्यंत किती जणांवर कारवाई?