Thane Accident : मुंबई नाशिक महामार्गावर झोपडीवर ट्रक पलटला, अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू

माजिवडा येथे मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या वाहिनीवरती एका ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यावेळी रस्त्याच्या बाजूला वस्ती करून राहत असलेल्या एका झोपडीवर ट्रक पलटी झाला.

Thane Accident : मुंबई नाशिक महामार्गावर झोपडीवर ट्रक पलटला, अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू
यमुनानगरमध्ये कावड यात्रेदरम्यान भीषण अपघातImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 7:24 PM

ठाणे : मुंबई-नाशिक हायवेवर एका ट्रक (Truck) चालकाचा वाहनावरील ताबा (Control) सुटल्याने ट्रक रस्त्याशेजारील झोपडीवर पलटी झाला. यावेळी झोपडीत झोपलेल्या 14 वर्षाच्या मुलीच्या अंगावर हा ट्रक पडल्याने यात मुलीचा मृत्यू (Death) झाला आहे. शुक्रवारी सकाळी 6.14 वाजण्याच्या सुमारास मुंबई-नाशिक हायवेवर माजिवडा ब्रिजजवळ ही घटना घडली. मधु भाटी असे अपघातातील मृत मुलीचे नाव असून ती मूळची गुजरात येथील रहिवासी आहे. रस्त्याच्या बाजूला टेडी बिअर, खेळणी विकून ही मुलगी आपला उदरनिर्वाह करत होती आणि तेथेच झोपडी बांधून राहत होती. अपघातानंतर मुलीला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

ट्रक अंगावर पडल्याने मुलीचा मृत्यू, वाहन चालक फरार

माजिवडा येथे मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या वाहिनीवरती एका ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यावेळी रस्त्याच्या बाजूला वस्ती करून राहत असलेल्या एका झोपडीवर ट्रक पलटी झाला. झोपडीमध्ये झोपलेल्या एका मुलीच्या अंगावर ट्रक पडला. अपघातानंतर ट्रक चालक तेथून पळून गेला आहे. अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, 1 पिकअप वाहन, 1 बाईक ॲम्बुलन्स, कापूरबावडी वाहतूक पोलीस कर्मचारी, कापूरबावडी पोलीस कर्मचारी, 2 क्रेन वाहने, 108 रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या जवानांसह 1 रेस्क्यू वाहन घटनास्थळी दाखल झाले. ट्रकखाली दबलेल्या मुलीला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचारकरीता नेले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर मुलीला मयत घोषित केले. (A 14-year-old girl died in the accident when a truck overturned on a hut on the Mumbai-Nashik highway)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.