चुकून ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबला, कारची सहा गाड्यांना धडक

नवी मुंबईतील पामबीच रोडवर कारने सहा वाहनांना धडक दिल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातात एक रिक्षाचालक जखमी झाला आहे.

चुकून ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबला, कारची सहा गाड्यांना धडक
नवी मुंबईत पामबीच रोडवर विचित्र अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 2:58 PM

नवी मुंबई / रवी खरात : ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय पडल्याने कारने पुढे चाललेल्या सहा वाहनांना धडक दिल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. नवी मुंबईतील पाम बीच रोडवर हा विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात एक रिक्षा चालक जखमी झाला आहे. जखमी रिक्षाचालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघातप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

चुकून ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्याने अपघात

सिवूड येथून पामबीचच्या दिशेने सकाळी एक सफेद रंगाची कार चालली होती. यावेळी कार थांबवण्यासाठी कारचालक ब्रेक दाबत होता. मात्र ब्रेकऐवजी चुकून एक्सलेटर दाबला गेला. यानंतर कार सुसाट वेगात जाऊन पुढे चाललेल्या वाहनांना धडकली. चार मोटारसायकल आणि दोन रिक्षांना कारने जोरदार धडक दिली. यात एक रिक्षा चालक जखमी झाला.

अपघातात गाड्यांचं नुकसान

अपघातात कारसह सर्व गाड्यांचं नुकसान झालं आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळशी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी एनआरआय पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

टेम्पो आणि बसमध्ये अपघात

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलाजवळ रात्री टेम्पो आणि बसमध्ये भीषण अपघात झाल्याने टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालक पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बसमध्ये कॅथे पॅसिफिक एअरलायन्सचे कर्मचारी होते आणि ताज लाईंड हॉटेल जात होते.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.