Beed Abortion : गर्भात दुसरीही मुलगीच, विवाहितेचा बळजबरीने गर्भपात, बीडमध्ये डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल

संभाजी मुंडे

संभाजी मुंडे | Edited By: वैजंता गोगावले, Tv9 मराठी

Updated on: Jul 26, 2022 | 9:11 PM

लग्न झाल्यापासूनच पती नारायण आणि सासू छाया महिलेला मारहाण आणि शिवीगाळ करून छळत होते. महिलेला तिच्या माहेऱ्यांशीही बोलू दिले जात नव्हते.

Beed Abortion : गर्भात दुसरीही मुलगीच, विवाहितेचा बळजबरीने गर्भपात, बीडमध्ये डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल
गर्भात दुसरीही मुलगीच, विवाहितेचा बळजबरीने गर्भपात
Image Credit source: TV9

बीड : बीडमध्ये बेकायदेशीर गर्भपाता (Illegal Abortion)च्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. दुसरी मुलगी नको म्हणून एका विवाहितेचा बळबरीने गर्भपात केल्याची घटना परळीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी सासरच्या तिघांसह डॉक्टरवर गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला पहिली मुलगी (Girl) असून आता दुसऱ्यांदा गरोदर होती. मात्र दुसरी मुलगी नको म्हणून एका डॉक्टरला हाताशी धरुन बेकायदेशीर गर्भलिंगनिदान केले. त्यानंतर गर्भात मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर पती आणि सासू, सासऱ्यांच्या सांगण्यावरुन त्या महिलेचा बळजबरीने गर्भपात केला. या गर्भपातास पीडित महिलेने विरोध केला. मात्र तिचे कुणीही ऐकले नाही. अखेर या महिलेने परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पती, सासू, संबंधित डॉक्टर आणि अन्य एका महिलेवर गुन्हा दाखल केला.

लग्न झाल्यापासूनच महिलेचा सुरु होता छळ

सरस्वती नारायण वाघमोडे (22 रा. शिवाजीनगर, परळी) असे पिडीत महिलेचे नाव आहे. सरस्वतीचा विवाह 2020 साली नारायण अंकुश वाघमोडे याच्याशी झाला होता. नारायण परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रात नोकरीवर आहे. लग्न झाल्यापासूनच पती नारायण आणि सासू छाया महिलेला मारहाण आणि शिवीगाळ करून छळत होते. महिलेला तिच्या माहेऱ्यांशीही बोलू दिले जात नव्हते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सरस्वतीने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर यावर्षी सरस्वती पुन्हा गर्भवती राहिली. त्यानंतर पती आणि सासूने तिची बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी केली. या चाचणीत पोटात मुलीचा गर्भ असल्याचे कळल्याने बळजबरी महिलेचा गर्भपात केला.

संभाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल

दरम्यान, 16 जुलै रोजी सरस्वतीचा भाऊ पती आणि सासूला विनंती करून तिला घेऊन पुण्याला गेला. गर्भपात झाल्यामुळे तिला खूप शारीरिक त्रास होत होता. अखेर तिने पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराविरोधात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, डॉ. स्वामी आणि प्रक्षा कावळे या चौघांवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 313, 315, 318, 34, 498-अ, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. (A case has been registered against four people including a doctor in connection with illegal abortion in Beed)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI