तीनपट व्याजाचे आमिष दाखवून इन्स्टाग्रामवर गंडा घालायचे, ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात

| Updated on: Mar 13, 2023 | 8:38 PM

दोन तरुणांची गुंतवणुकीच्य नावे फसवणूक झाली होती. तरुणांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रकरणाचा शोध सुरु केला असता, जे उघड झालं ते धक्कादायक होतं.

तीनपट व्याजाचे आमिष दाखवून इन्स्टाग्रामवर गंडा घालायचे, असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात
आर्थिक फसवणूक करणारी टोळी अटक
Image Credit source: TV9
Follow us on

नागपूर / सुनील ढगे : तीनपट व्याजाचे आमिष दाखवत नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास नागपूर पोलिसांना यश आले आहे. या आंतरराज्यीय टोळीतील 8 आरोपींना पकडण्यात नागपूरच्या प्रतापनगर पोलिसांना यश आलं आहे. इंस्टाग्रामवर विक्रांत एक्स्चेंज नावाने पेज बनवून, त्या माध्यमातून तीन दिवसात तीन पट व्याजाचं आमिष देऊन फसवणूक करायची. आरोपींकडून 58 लाख रुपये नगदी कॅश आणि पैसे मोजण्याचे मशीन जप्त करण्यात आलं आहे. हे पैसे हवालाचे आहे का?, यात आणखी कोणाचा कोणाचा सहभाग आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

दोन तरुणांनी फसवणुकीची तक्रार दाखल करताच गुन्हा उघड

ही टोळीने विक्रांत एक्स्चेंज नावाने इन्स्टाग्रामवर होम पेज बनवले होते. त्या माध्यमातून 3 दिवसात 3 टक्के व्याजाचं आमिष दाखवत ऑनलाईन आणि ऑफलाईन फसवणूक करत होते. दोन मित्रांनी यात आपले पैसे गुंतवले होते. मात्र ते जेव्हा आपला परतावा मागायला गेले, तेव्हा त्यांना वेगवेगळी कारणे देत आणखी गुंतवणूक करण्यास सांगितलं. या दोन्ही मित्रांच्या आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपींच्या ठिकाणावर धाड टाकत रोकड जप्त केली

तरुणांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपींच्या लकडगंज परिसरातील ठिकाणावर धाड टाकली असता, त्या ठिकाणी मशीनच्या साह्याने पैसे मोजने सुरू होते. मात्र या पैशाचा कुठलाही हिशोब यांच्याकडे नव्हता. पोलिसांनी या ठिकाणी असलेले 58 लाख रुपये नगदी कॅश जप्त केली, तर ज्याच्या नावावर हे सगळं सुरू होतं त्याच्यासह 8 जणांना पोलिसांनी अटक केली.

हे सुद्धा वाचा

आरोपींमधील अधिक जण हे गुजरात राज्यातील असून, गेल्या काही दिवसांपासून ते नागपुरात राहत होते. या टोळीत आणखी मोठे चेहरे असण्याची शक्यता असून, या ठिकाणी मिळून आलेली रक्कम ही हवालाची आहे का या दिशेने सुद्धा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.