भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले, मग जे घडले ते भयंकर !

नांदेड जिल्ह्यातील चार तरुण हैदराबादला एका घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून चौघेही कारने घरी परतत होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.

भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले, मग जे घडले ते भयंकर !
नांदेडमधील चौघांचा हैदराबादमध्ये कार अपघातात मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 7:43 PM

नांदेड / राजीव गिरी : घरगुती कार्यक्रमासाठी हैदराबादला गेलेल्या तरुणांच्या गाडीला नांदेडला परतत असताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली. अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हैदराबादहून नागपूरकडे निघालेली भरधाव कार उभ्या असलेल्या कंटेनरच्या खाली घुसल्याने हा भीषण अपघात झाला. निजामाबाद जिल्ह्यात ही घटना घडली. मृतांमध्ये सख्या भावांचा समावेश आहे. गणेश निरडी, आदित्य निरडी, प्रकाश अंकलवार आणि साईराम बाळू सनपरामू अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाटवण्यात आले.

चौघेही नांदेडच्या कुंडलवाडी गावचे रहिवासी

चौघे तरुण नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी गावातील रहिवासी आहेत. चौघेही हैदराबाद येथील येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून ते कारने परतत होते. निजामाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 44 वर इंदलवाई मंडळातील चंद्रायनपल्ली येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार थेट कंटेनरखाली घुसली.

चौघांचा जागीच मृत्यू

अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचाही चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चौघांचे मृतदेह बाहेर काढत निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तरुणांच्या मृत्यूमुळे कुंडलवाडी गावावर शोककळा पसरली आहे. तर निरडी कुटुंबातील दोघा भावांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.