पतीने मटण आणले नाही म्हणून वाद झाला, मग मुलांसमोरच पत्नीला…

पतीने पत्नीला मटण आणण्यास सांगितले होते. मात्र पत्नीने ऐकले नाही. पती रात्री घरी जेवायला आल्यानंतर मटणावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला अन् भयंकर घटना घडली.

पतीने मटण आणले नाही म्हणून वाद झाला, मग मुलांसमोरच पत्नीला...
जमिनीच्या वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 4:00 PM

अलीगढ : पतीने मटण आणले नाही म्हणून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून पतीने पत्नीला संपवल्याची घटना उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती तेथून पळून चालला होता. मात्र नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. देहलीगेट येथील ममुद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सगीर खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी पत्नीचा मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे.

पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे

कासगंजच्या ढोलना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भामो गावात राहणाऱ्या सगीर खानचे 10 वर्षांपूर्वी रोरावार पोलीस ठाण्याच्या कासगंज भागातील गुड्डोशी लग्न झाले होते. दोघांना तीन मुली आहेत. दोघांमध्ये नेहमी कौटुंबिक वाद होत होते. याच वादातून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती.

रविवारी मटणावरुन झालेला वाद टोकाला गेला

गुड्डोने रविवारी रात्री सगीरला मटण आणण्यास सांगितले होते. सगीरने मटण आणले नाही. रविवारी रात्री सगीर नमाज अदा करुन 10.30 वाजण्याच्या सुमारास घरी आला. घरी आल्यानंतर सगीरने मटण आणले नाही म्हणून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर त्याने पत्नीकडे चपाती मागितली तर तिने स्वतः उठून घेण्यास सांगितले.

हे सुद्धा वाचा

यानंतर सगीरला संताप अनावर झाला आणि रागाच्या भरात त्याने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. यावेळी मुलींचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले. शेजाऱ्यांना पाहून सगीर पळून चालला होता. पण लोकांनी पाठलाग करुन त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.