AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 मोबाईल, 3 व्यक्ती… राजच निघाला मिस्ट्री बॉय; राजा रघुवंशी प्रकणात मोठा ट्विस्ट, सोनमकडून मोठी माहिती समोर

आतापर्यंतच्या तपासातून समजलं आहे की सोनम आणि राज यांच्यात खोल मैत्री होती. चौकशीत सोनमने दावा केला की तिने हे कृत्य मैत्री खातिर केलं, पण पोलिसांना शंका आहे की यामागे काही मोठा हेतू किंवा आर्थिक व्यवहार असू शकतो.

3 मोबाईल, 3 व्यक्ती... राजच निघाला मिस्ट्री बॉय; राजा रघुवंशी प्रकणात मोठा ट्विस्ट, सोनमकडून मोठी माहिती समोर
raja raghuvanshiImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jun 19, 2025 | 3:58 PM
Share

राजा हत्याकांडात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पोलिस आज कोर्टात पाचही आरोपींना, ज्यामध्ये मुख्य आरोपी सोनमचाही समावेश आहे, त्यांच्या रिमांडची मुदत वाढवण्याची मागणी करणार आहेत. या खळबळजनक प्रकरणात अनेक रहस्यं अद्याप अनुत्तरित आहेत आणि पोलिस हे गूढ उलगडण्यासाठी सखोल तपास करत आहेत. शेवटी, सोनमने मोठी माहिती दिली आहे.

पैशासाठी हत्या झाली का?

पोलिसांना या हत्याकांडाच्या कटाच्या सर्व थरांचा उलगडा करायचा आहे. आतापर्यंतच्या तपासातून समजलं आहे की सोनम आणि राज यांच्यात खोल मैत्री होती. चौकशीत सोनमने दावा केला की तिने हे कृत्य मैत्रीच्या खातिर केलं, पण पोलिसांना शंका आहे की यामागे काही मोठा हेतू किंवा आर्थिक व्यवहार असू शकतो. तपासात समोर आलं आहे की सोनमला खर्चासाठी 50 हजार रुपये देण्यात आले होते. प्रश्न हा आहे की ही रक्कम फक्त खर्चासाठी होती, की हत्येच्या कटाचा भाग होती?

राजने बनावट कागदपत्रांवर घेतलं होतं सिम

एक नवीन खुलासा या प्रकरणाला आणखी गुंतागुंतीचं बनवतो. राजने बनावट कागदपत्रांवर एक सिम कार्ड घेतलं होतं, ज्याच्या माध्यमातून तो सोनमशी बोलत होता. पोलिसांना आतापर्यंत चारपैकी तीन मोबाइल फोन सापडलेले नाहीत, ज्यामध्ये सोनम आणि राजा यांचे प्रत्येकी दोन फोन आहेत. सोनम तिच्या फोनवरुन संजय वर्मा नावाच्या मिस्ट्री बॉयशी बोलायची. हा मिस्ट्री बॉय राज कुशवाह असल्याचे उघड झाले आहे. तिच्या फोनमधील डेटा कटाच्या अनेक कड्या जोडू शकतो.

या कटात सहावा व्यक्तीही सामील आहे का?

पोलिसांना शंका आहे की या कटात कदाचित सहावा व्यक्तीही सामील असू शकतो. त्याचबरोबर, सोनमच्या कुटुंबीयांवरही तपासाची टांगती तलवार आहे. सोनमने हे सर्व एकटीने केलं, की कुटुंबाच्या संमतीने? असाही प्रश्न उपस्थित होत आहे की सोनमने मैत्रीच्या नावाखाली हत्या केली, की तिला पैशाचा लोभ दाखवण्यात आला?

कोर्टात आज पोलिस 14 दिवसांच्या रिमांडची मागणी करू शकतात, ज्यापैकी 8 दिवस आधीच पूर्ण झाले आहेत. पुढील 6 दिवसांत पोलिस या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतील. जनतेच्या नजरा या गोष्टीवर खिळल्या आहेत की पोलिस या रहस्यांवरून पडदा उचलू शकतील, की सोनमची ‘रहस्यं’ अजूनही खोलवर दडलेली आहेत?

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं