पुण्यातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीची मध्य प्रदेशातून सुटका, 50 हजारासाठी ओळखीच्या महिलेनेच मुलीला विकले !

पुण्यातील 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली. मुलीचा शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली.

पुण्यातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीची मध्य प्रदेशातून सुटका, 50 हजारासाठी ओळखीच्या महिलेनेच मुलीला विकले !
बेपत्ता अल्पवयीन मुलीची सुटकाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 1:35 PM

पुणे / प्रदीप कापसे : पुण्यातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. सदल मुलीची मध्य प्रदेशातून सुटका करण्यात आली आहे. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार तिच्या पालकांनी दिली होती. यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान बेपत्ता मुलगी मध्य प्रदेशात असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने मुलीची सुटका करत मुलीला पालकांच्या ताब्यात दिले. ओळखीच्या महिलेनेच 50 हजार रुपयांसाठी मुलीला विकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

आरोपी महिला आणि पीडित मुलगी एकाच ठिकाणी नोकरी करत होत्या

सदर मुलगी एका वर्कशॉपमध्ये काम करीत होती. त्याच वर्कशॉपमध्ये शांती ऊर्फ सन्तो हरनाम कुशवाह ही मूळची मध्य प्रदेशची असलेली महिला काम करत होती. या महिलेने मुलीला तुझ्या आवडता मुलगा मध्यप्रदेश येथे गेला आहे. त्याने तुला लग्नासाठी बोलावले आहे, असे खोटे सांगून फूस लावून मध्य प्रदेशात नेले.

महिलेने लग्नासाठी मुलीला 50 हजारात विकले

धर्मेंद्र यादव याने लग्नासाठी मुलगी आणण्यासाठी आरोपी महिलेला सांगितले होते. यासाठी तिला 50 हजार रुपये देऊ केले होते. त्याप्रमाणे महिला या मुलीला फूस लावून मध्य प्रदेशात घेऊन गेली. तेथे गेल्यानंतर मुलीचे जबरदस्तीने धर्मेंद्र यादव याच्यासोबत लग्न लावून देण्यात आले. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुला आणि तुझ्या घरच्यांना जीवे मारू, अशी धमकी मुलीला देण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी नातेवाईकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वेगाने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान मुलगी मध्य प्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल पोरात पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा, पोलीस शिपाई सागर काँडे, महिला पोलीस शिपाई पूजा लोंढे यांचे पथक मध्यप्रदेश येथे तात्काळ रवाना झाले.

दोघा आरोपींना अटक

पोलिसांना मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील सेवढा येथील ग्यास ग्राम येथील स्थानिक पोलिसांकडून मुलीचे लग्न लावून दिल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने पुणे पोलिसांनी सदर घरावर छापा टाकून मुलीला ताब्यात घेतले.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 363, 366, 376 (2) (आय) (एन) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 17 सह बाल-विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 चे कलम 9, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सदर महिला आणि लग्न करणारा तरुण दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.