वादग्रस्त स्टेटसवरुन सांगलीत तणाव, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला !

कोल्हापूरनंतर आता सांगलीत वादग्रस्त स्टेटस प्रकरण घडले आहे. एका तरुणाने फेसबुकवर वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केल्याने गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

वादग्रस्त स्टेटसवरुन सांगलीत तणाव, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला !
महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणारा आरोपी अटक
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 13, 2023 | 4:22 PM

सांगली : कोल्हापूरनंतर सांगलीत स्टेटसवरुन तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. सांगली नजीकच्या कसबे डिग्रज गावात एका युवकाने वादग्रस्त स्टेटस ठेवल्यानंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी संबंधित युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सध्या गावामध्ये शांतता आहे. काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर गावातील ज्येष्ठ मंडळी आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. गावामध्ये शांतता आणि व्यवस्था राखण्याचे आवाहन सुद्धा पोलिसांनी केले आहे. सध्या कसबे डिग्रज गावामध्ये उत्स्फूर्त बंद असून सर्वत्र शांतता आहे.

पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली

सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गावातीलच एका युवकांनी आपल्या फेसबुक स्टेटस वर वादग्रस्त पोस्ट करणारा व्हिडिओ लावल्याचे निदर्शनास आले. यानंतर गावातील युवकांनी संबंधित व्यक्तीला याबाबत जाब विचारला. यानंतर संपूर्ण गावांमध्ये ही बातमी पसरल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण आणले.

डिग्रज गावात व्यापाऱ्यांकडून उत्फूर्त बंद

या घटनेचा निषेध म्हणून आज सकाळपासून कसबे डिग्रज गावातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पुकारला आहे. या बंदमध्ये गावातील प्रमुख बाजारपेठमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. याचबरोबर सकाळपासून गावामध्ये पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामस्थांनी सुद्धा वादग्रस्त पोस्ट ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. तर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या युवकावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे.