Buldhana Theft : डोंगर पोखरुन हाती लागला उंदीर….! बुलढाण्यातील चोरट्याची झाली ‘ही’ फजिती; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

बुलढाणा शहरातील भगवती कॉम्प्लेक्समधील नवरंग जनरल स्टोअर्स, शंकर बूक डेपो, लाठे किराणा ही दुकाने रात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास फोडण्यात आली. चोरट्यांनी या तिन्ही दुकानांचे शटर वाकवून रोख रक्कम लंपास केली.

Buldhana Theft : डोंगर पोखरुन हाती लागला उंदीर....! बुलढाण्यातील चोरट्याची झाली 'ही' फजिती; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
बुलढाण्यात वाईन शॉपमध्ये चोरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 8:56 PM

बुलढाणा : शहरातील चोर्‍यांचे सत्र कायम आहे. आज (बुधवारी) दिवसभरात चार ठिकाणी चोरट्यांनी बंद दुकानांचे शटर वाकवून हजारो रुपयांचा एवज चोरून नेल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. याचदरम्यान चोरीच्या एका घटनेची चर्चा शहरभर चांगलीच रंगली आहे. चोरट्यांनी एका ठिकाणी मोठे प्लॅनिंग करून चोरी (Theft) केली, पण या चोरीत हाती फक्त बियरची बाटली (Bear Bottle) लागली. त्यामुळे चोरट्याच्या सगळ्या प्लॅनिंगवर पाणी फेरले गेले. पण चोरट्याला परिसरात दहशत निर्माण करण्यात यश आले आहे. चोरट्याची फजिती सीसीटीव्ही (CCTV)मध्ये कैद झाली असून सोशल मिडियातही या चोरीचे फूटेज व्हायरल झाले आहे. चोरट्याच्या फजितीवर ‘डोंगर पोखरून हाती लागला उंदीर’ अशी खुमासदार चर्चा सुरु झाली आहे. शहरातील चोरीचे हे सत्र कधी थांबणार? पोलिस यंत्रणा चोरट्यांवर कारवाई करण्यात अपयशी का ठरतेय, असे सवाल दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

मध्यरात्रीच्या सुमारास दुकाने फोडली; रोख रक्कमेची लूट

चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोऱ्यांचा धडाका लावला आहे. मंगळवारी रात्रीही अशाच चोरीच्या घटनांनी चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. बुलढाणा शहरातील भगवती कॉम्प्लेक्समधील नवरंग जनरल स्टोअर्स, शंकर बूक डेपो, लाठे किराणा ही दुकाने रात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास फोडण्यात आली. चोरट्यांनी या तिन्ही दुकानांचे शटर वाकवून रोख रक्कम लंपास केली. यात शटरचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले गेले आहे. येथे चोऱ्या केल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा संगम चौकातील ऋचा वाइन शॉपकडे वळविला. या शॉपचे शटर वाकवून चोरट्याने आत प्रवेश केला. मात्र या प्रयत्नात चोरट्याच्या हाती निराशा आली. चोरट्याने फक्त एक बियरची बाटली चोरली आणि तेथून तो फरार झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस सध्या सर्व घटनांचे परस्परांशी काही संबंध आहेत का हे तपासत आहेत.

पोलिसांनी कडक पावले उचलावीत, गस्त वाढवावी

बुलढाणा शहर हे एक वर्दळीची बाजारपेठ मानली जाते. येथे आसपासच्या परिसरातील लोकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे येथील व्यापारी वर्गाला सुगीचे दिवस आहेत. याचाच गैरफायदा चोरट्यांकडून उठवला जात आहे. चोरटे दिवसाढवळ्या रेकी करत असावेत, त्यानंतर रात्री वर्दळ कमी झाल्याचे हेरतात. योग्य संधी साधून चोरटे दुकानांची शटर वाकवून चोरी करीत आहेत. लागोपाठ चोरीच्या घटना घडत असताना स्थानिक पोलिस यंत्रणा कारवाईमध्ये एवढी उदासिन का? असा संतप्त सवाल दुकानदार आणि नागरिकांकडून केला जाऊ लागला आहे. स्थानिक पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी बुलढाणा शहरातील दुकानदार शेख अतिक शेख रफीक यांच्यासह व्यापारी संघटनेच्या सदस्यांनी केली आहे. (A theft incident in a wine shop in Buldhana was caught on CCTV)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.