तुरीने भरलेला ट्रक झाला पलटी, अरुंद पुलाचा अंदाज न आल्यामुळे…
अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यात तुरीने भरलेला ट्रक पुलाच्या खाली पडला, ट्रकमध्ये मालाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्याचबरोबर ट्रकचं सुध्दा अधिक नुकसान झालं आहे. झालेला अपघात पाहायला सकाळपासून गर्दी झाली आहे.

गणेश सोनोने, अकोला : अकोला (Akola) जिल्हातल्या बाळापूर (balapur) तालुक्यातील वाडेगाव ते बाळापुर रोडवर रात्रीच्या सुमारास वाडेगाव (wadegaon) कडून इटारसीकडे जात असताना मांडवा फाटाच्या पुढे असलेल्या वघाडी नाल्यावरील पूल अरुंद असल्याने पुलाचा अंदाज न आल्याने पुलावरून ट्रक खाली पडून अपघात झाला. यामध्ये ट्रक ड्रायवर आणि क्लीनर हे जखमी झाले असून यात या ट्रकचे (truck accident) मोठे नुकसान झाले आहे. तर हा ट्रक वाडेगाव येथील व्यापाऱ्याची तूर इटारसीला घेऊन जात होता. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी मोठा आवाज झाला, त्यावेळी तिथं लोकांची मोठी गर्दी झाली होती. त्याचबरोबर सकाळपासून तिथं मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

तुरीने भरलेला ट्रक पुलाच्या खाली पडला
गाडीचा चालक आणि क्लिनर जखमी झाला असल्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सुध्दा रात्री घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ट्रकमधील तूर दुसऱ्या वाहनाने हलवण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. नेमका अपघात कशामुळे झाला याची पोलिस चौकशी करणार आहे.

truck accident
रात्रीच्या सुमारास अनेकदा रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे अपघात होत असतात. सध्याचा झालेला अपघात हा सुध्दा त्याचपद्धतीचा असल्याचं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. चालकाला अंदाज न आल्यामुळे अपघात झाला आहे.
