AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पर्स देण्याचा बहाणा, रिक्षा चालकाने केली चुकी, विधवा महिलेच्या तक्रारीनंतर पोलिस सुध्दा हादरले

बीड मधील गंभीर प्रकरण उजेडात, सात जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, विधवा महिलेने पोलिसांना हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांना सुध्दा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी सुरु केली आहे.

पर्स देण्याचा बहाणा, रिक्षा चालकाने केली चुकी, विधवा महिलेच्या तक्रारीनंतर पोलिस सुध्दा हादरले
beed policeImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 20, 2023 | 1:29 PM
Share

बीड : रिक्षात विसरलेली पर्स परत देण्याच्या बहाण्याने विधवा महिलेच्या घरात घुसून रिक्षाचालकाने (rickshaw Driver) तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर रिक्षाचालकासह 7 जणांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये (BEED) उघडकीस आला आहे. या प्रकरणी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार उजेडात आल्यापासून बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांची पोलिस (BEED POLICE) कसून चौकशी करीत आहेत. बीड जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून अधिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

बीडमधील कबाड गल्लीतील रूमवर…

बीड येथील एका विधवा महिला पर्स संदीप पिंपळे याच्या रिक्षात प्रवास करीत असताना विसरली होती. पर्स परत देण्याच्या बहाण्याने पिंपळे याने महिलेस बीडमधील कबाड गल्लीतील रूमवर बोलावून घेतले आणि त्याचं ठिकाणी अत्याचार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना 2014 साली घडली होती असं देखील पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

beed police

beed police

हिवरा पहाडी रोडलगत असणाऱ्या घाटात नेले

2020 मध्ये गोरख इंगोले याने जबरदस्तीने पीडीत व्यक्तीला आपल्या दुचाकीवर बसवून जरूड ते हिवरा पहाडी रोडलगत असणाऱ्या घाटात नेले होते. त्यावेळी तिथं त्यांच्या चार मित्रांनी अत्याचार केला. यामध्ये महिला गर्भवती राहिल्याने तिचा जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचं तक्रारीत विधवा पीडित व्यक्तीने केला आहे.

beed police

beed police

यांना घेतलंय ताब्यात

महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संदीप पिंपळे (रा. कबाड गल्ली, बीड), बालाजी इंगोले, गोरख इंगोले (दोघेही रा. आहेर धानोरा, ता. बीड) यांच्यासह अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतलेल्या प्रत्येक आरोपीची कसून चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बीडच्या ग्रामस्थांनी केली आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.